सध्या छोट्या पडद्यावर अनेक रिअॅलिटी शो सुरु आहेत. यापैकीच एक शो म्हणजे, ‘सुपरस्टार सिंगर’. हा शो सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, शोमधील एका स्पर्धकाचे आपल्या गुरुसोबतचे वागणे अनेकांना खटकले आहे. केवळ एवढेच नाही तर आता सोशल मीडियावर या स्पर्धकाला बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या स्पर्धकाचे नाव आहे, शोएब. चिमुकल्या शोएबने आपल्या आवाजाने अनेकांना भुरळ घातली आहे. पण शोदरम्यानचे त्याचे वागणे मात्र अनेकांना आवडले नाही. शोमध्ये सलमान अली (इंडियन आयडॉल 10 चा विजेता) त्याचा मेंटॉर आहे. अलीकडे या शोमध्ये अनु मलिक यांनी हजेरी लावली. अनु मलिक यांनी चिमुकल्या शोएबला एक चॅलेंज दिले. ते म्हणजे सलमान अलीपेक्षा चांगले गाऊन दाखवायचे. तू सलमानपेक्षा चांगला गायला तर तू सलमानपेक्षा चांगला गायक आहेस, हे मी मानेल, असे अनु मलिक त्याला म्हणाले. यावर शोएब त्याच्या गुरुसोबत म्हणजे, सलमानसोबत ज्या पद्धतीने बोलला ते पाहून अनेकांना धक्का बसला. अर्थात त्याच्या बोलण्याचे जराही वाईट वाटून न घेता सलमानने सगळे हसण्यावारी नेले. पण प्रेक्षकांला मात्र शोएबने आपल्या गुरुसोबत अशा पद्धतीने बोलणे आवडले नाही. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्यात.
एका युजरने तर हे सगळे लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली. या लहान मुलाच्या चेहºयावरचे भाव पाहा. सोनीने हे सगळे आॅनएअर केले, हे पाहून मला धक्का बसला. हे सगळे थांबवा, असे या युजरने लिहिले. शक्य असेल तर हे सगळे थांबवा आणि या मुलाला बाहेर काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली.
या शोमध्ये हिमेश रेशमिया, अलका याग्निक, जावेद अली जज आहेत. तर सलमान अली, सचिन वाल्मिकी, नितीन कुमार हे स्पर्धकांच्या मेंटॉरच्या भूमिकेत आहेत.