मेरे साई या मालिकेतील या दृश्यासाठी सुप्रिया पिळगांवकर यांना घ्यावे लागले अनेक रिटेक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 10:22 AM2018-01-31T10:22:25+5:302018-01-31T15:52:25+5:30
मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई ...
म रे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई बाबांच्या आयुष्यातील अनेक घटना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत साईंची भूमिका अबीर सुफी, झिपरीची भूमिका धृती मंगेशकर साकारत आहे. तसेच तोरल रासपुत्र, वैभव मांगले यांसारखे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. अबीर सूफी, तोरल रासपुत्र आणि वैभव मांगले या मुख्य कलाकारांच्या कलात्मक अभिनयामुळे मालिकेने लोकांची मने जिंकली आहेत. आता या मालिकेच्या टीममध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर दाखल झाल्या आहेत. सुप्रिया या मालिकेत अगदी वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्या सुहासिनीची भूमिका साकारत असून त्यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. पण या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची एक वेगळीच कोंडी झाली आहे. टेलिव्हिजनवर आजवर अनेक भूमिका सहज करणार्या या अभिनेत्रीला संतापण्याचा अभिनय करणे अवघड झाले आहे. एका विशिष्ट दृश्यासाठी सुप्रियाला साई बाबांची भूमिका साकारणार्या अबीर सूफीवर संतापायचे होते. साई बाबांची निस्सीम भक्त असलेल्या सुप्रियाला आपल्या दैवतावर संतापणे जमतच नव्हते. हे दृश्य अचूक टिपण्यासाठी टीमला खूप टेक घ्यावे लागले. याबाबत सुप्रिया पिळगावकर यांनी सांगितले, “या मालिकेचा माझ्यावर इतका खोल प्रभाव आहे की साईंची भूमिका अप्रतिम साकारणार्या अबीरवर संताप व्यक्त करणे मला फारच जड जात होते. अनेक टेक घेतल्यानंतर मला संतापण्याचा अभिनय करता आला. एका प्रकारे माझ्या टेलिव्हिजनवरील कारकिर्दीतील अभिनयाच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक क्षणांपैकी हा एक होता.”
‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मालिका संपत असताना सोनीवर लवकरच मेरे साई मालिका सुरू होत असल्याची घोषणा सुप्रिया पिळगांवकर यांनीच केली होती. त्या वेळेपासूनच त्यांना या मालिकेचा भाग होण्याची इच्छा होती. त्या ही मालिका टीव्हीवर नियमितपणे बघतात. या मालिकेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली असल्याने त्या सध्या चांगल्याच खूश आहेत.
Also Read : मेरे साई या मालिकेतील अबीर सुफीची नवी मैत्रीण तुम्ही पाहिली का?