अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर घराघरात लोकप्रिय आहेत. गेली तीन दशकांहून अधिक काळ सुप्रिया पिळगांवकर रसिकांचे मनोरंजन करत आहेत. मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमधून आजही रसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. अभिनयाव्यतरिक्त सुप्रिया पिळगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपले आगामी प्रोजेक्टस फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. सुप्रिया पिळगांवकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या त्यांच्या या पोस्टचीच चर्चा आहे. साईट सेव्हरसीन या संस्थेला सुप्रिया पिळगावकर यांनी आर्थिक मदत पाठवली होती. पण ज्या संस्थेला त्यांना रक्कम पाठवायची होती ती त्या संस्थेला न मिळता दुस-याच संस्थलेला मिळाली. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावर दिली आहे. रक्कम त्यांनी एनजीओच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली होती.
ट्रान्सफर केलेली रक्कम त्या बँकेत जमा झाल्याचा मेसेजही त्यांना पेटीएमवर आला होता. हेच विचारण्यासाठी त्यांनी साईट सेव्हरसीन संस्थेशी संपर्क साधला. तर रक्कम मिळाली नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. यावेळी ही रक्कम भलत्याच अकाउंटला गेल्याचे सुप्रिया पिळगांवकर यांच्या लक्षात आले.
त्यांच्याकडून नेमकी काय चूक झाली आहे हे कळताच इतरांनी अशी चूक करु नये यासाठी त्यांनी घडलेला प्रकार सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला. पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितले की कुणालाही मदत पाठवताना संबंधीत संस्थेचं नाव पुन्हा एकदा तपासून त्याची शहानिशा केल्यानंतरच रक्कम ट्रान्सफर करा. आपल्याकडून घाईत ट्रान्झेक्शन झाले त्यामुळे काही गोष्टी तपासण्याच्या राहून गेल्याचं त्यांनी यावेळी ट्वीटमधून स्पष्ट केले आहे.
नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज यांची आर्थिक बिकट परिस्थितीत जगणं जगत असल्याचे समोर आले होते. यावेली अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनीच पुढाकार घेत सविता बजाज यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्या होत्या. सिंन्टाच्या मदतीने सुप्रिया पिळगांवकर यांनी सविता बजाज यांच्या उपचारादम्यानचा सगळा खर्च देत मदत केली होती. सुप्रिया पिळगांवर 'कुछ रंग प्यार के ऐसी भी' आणि 'जननी' या मालिकेतही त्या भूमिका साकरत आहेत.