बिग बॉस मराठी सीझन ५ (Bigg Boss Marathi Season 5) चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) त्याच्या हटके स्टाईलमुळे आणि साध्या राहणीमानासाठी ओळखला जातो. सूरजच्या साधेपणामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. यामुळेच तो थेट बिग बॉस मराठीचा विजेता झाला. सूरज आता गावी स्वत:चं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण करत आहे. दरम्यान तो अजूनही त्याच्या 'झापूक झुपूक' स्टाईलमध्ये रील पोस्ट करतो. मात्र आता लोक त्याच्या या स्टाईलला कंटाळले आहेत.
सूरज चव्हाणने नवीन रील शेअर केलं आहे. यामध्ये तो सूट बूट आणि टाय घालून एकदम टापटीप तयार झाला आहे. फुलाफुलांचं ब्लेझर, हटके हेअरस्टाईल या लूकमध्ये तो रील व्हिडिओ शूट करत आहे. थलपती विजयचं वारिसूमधलं गाणं आणि स्वत:चं झापुक झुपूक गाण्याचं हे मॅशअप आहे. यावर त्याने झापुक झुपूक स्टेप केली आहे. एरवी सूरजचं रील म्हटलं की नेटकरी त्यावर लाईक्स,कमेंट्सचा वर्षाव करायचे. मात्र आता त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी सूरजला वेगळा सल्ला दिला आहे.
'सूरज भाऊ आता नवीन स्टेप करा खूप पुढे जायचं आहे', 'अरे काय एकच बस कर आता','भाव खातो आता सूरज चव्हाण' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा लवकरच येणार आहे. बिग बॉस सुरु असतानाच दिग्दर्शक केदार शिंदेंनी या सिनेमाची घोषणा केली होती. त्याच्या या सिनेमाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.