Join us  

Bigg Boss Marathi Season 5: 'मी अनाथ मुलगीच करणार...', सूरज चव्हाण असं का म्हणाला? ऐकून तुम्हीही व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 4:35 PM

Bigg Boss Marathi Season 5:सूरजने नुकतंच घरातील इतर काही मंडळींशी गप्पा मारत असताना आपण अनाथ मुलगीच करणार असा खुलासा केला.

बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi Season 5)  मध्ये १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. प्रत्येक जण अतिशय हुशार, तल्लख बुद्धीचा आहे. त्यामुळे यंदा काँटे की टक्कर होणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये एक अतिशय साधा स्पर्धक आहे ज्याला अजून खेळ कळलेला नाही पण माणसं समजली आहेत. त्याने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तो स्पर्धक म्हणजे 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाण.

सूरज चव्हाण बारामतीतील एका गावातून आला आहे. टिक टॉकवरील व्हिडिओंमुळे तो सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला. त्याला प्रेक्षकांचा  खूप सपोर्ट मिळताना दिसतोय. सूरजने नुकतंच घरातील इतर काही मंडळींशी गप्पा मारत असताना आपण अनाथ मुलगीच करणार असा खुलासा केला. निक्की, घन:श्याम आणि जान्हवीशी बोलताना तो म्हणाला, "आजी, आजोबा, पप्पा, मम्मी वरुन बघत असतील. मी पप्पांना अप्पा म्हणायचो. आईच्या शब्दात इतकी ताकद आहे ना ती कोणाच्यातच नाही. तिला इतकी माया असते ना, मांडीवर घेऊन झोपवणं, अंगाई गाणं, डोकं थोपटणं, ते दिवस खूप आठवतात. उगाचच मोठे झालो असं वाटतं. जन्म दिला आणि मग आपल्याला सोडून जातात हे मला फार वाईट वाटतं. सोडूनच जायचं असेल तर जन्मच द्यायचा नाही मग.  कोणाचंही सांगतो. आता बिचारे काही काही अनाथ असतात. मी तर अनाथ मुलगीच बायको करणार आहे. मी बी अनाथ, ती बी अनाथ. आता नशिबात अनाथ मुलगी असेल आणि ती मिळाली तर लय बरं होईल." सूरजच्या या वाक्यावर निकी म्हणते, 'तुझं नशीब तूच लिही. नशीब असं म्हणू नको तुला जे हवं ते तुझं नशीब. तूच लिहायचं ते'.

सूरजच्या या संभाषणानंतर सगळेच भावूक झाले. नेटकऱ्यांनीही त्याला पाठिंबा देत धीर दिला आहे. त्याच्यासारखा एवढा साधा बिग बॉसमध्ये आला असला तरी इतर सदस्य त्याची आपुलकीने काळजी घेताना दिसत आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया