Join us  

'मंडळात गणपती बसवायला पैसे नव्हते तेव्हा...'; सूरज चव्हाणची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक

By देवेंद्र जाधव | Published: September 09, 2024 12:00 PM

सूरज चव्हाणने खिशात पैसे नसताना मंडळात गणपती कसा बसवला? याची भावुक कहाणी सांगितली (suraj chavan)

बिग बॉस मराठीच्या घरात दरदिवशी काहीतरी नवीन राडे आणि टास्क पाहायला मिळतात. बिग बॉस मराठीच्या घरात यंदा सर्वच स्पर्धक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे गोलिगत धोका फेम सूरज चव्हाणची.(suraj chavan) सूरजने आजवर त्याच्या खेळाने बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये छाप पाडलीय. इतकंच नव्हे तर सूरज चव्हाण घराचा नवीन कॅप्टनही झाला आहे. सूरजने काल बिग बॉसच्या घरात इच्छा असूनही गणपती का बसवता आला नाही, याची कहाणी सांगितलीय. 

सूरजची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक

काल बिग बॉसच्या घरात गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन झालं. त्यावेळी सूरजने ही खास गोष्ट सांगितली. सूरज म्हणाला, "मला आमच्या मंडळात गणपती बाप्पा बसवायचा होता. पण माझ्याकडे एक रुपया नव्हता. पण मला एक संधी आली. तिथे मग काम केलं. गणपती बाप्पा बसवायचाय म्हणून तिथे पैसे गोळा केला. त्यांच्या हाताखाली काम केलं. आठवड्याला २ हजार रुपये मिळाले. मग गणपती बाप्पा  आणला. आणि वाजतगाजत बाप्पा बसवला."

मी आज इथे आहे तो बाप्पाचा आशीर्वाद: सूरज

सूरजची कहाणी ऐकून सर्वांनी त्याचंच कौतुक केलं. रितेशभाऊही भावुक झालेला दिसले. शेवटी सूरज म्हणाला, "मी त्यावेळी गणपती बाप्पाला बसवला. आज त्याचंच हे फळ आहे की बिग बॉसमध्ये मला गणपती बाप्पाने पाठवला." अशाप्रकारे सूरजची कहाणी ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान नवीन कॅप्टन येईपर्यंत सूरज सध्या घराचा कॅप्टन असून तो घराची जबाबदारी सांभाळत आहे. सूरज चव्हाण पहिले दोन आठवडे शांत होता. पण आता मात्र तो चांगला खेळ खेळतोय.

टॅग्स :गणेशोत्सव 2024बिग बॉस मराठीकलर्स मराठीरितेश देशमुख