Join us

सुरभि चंदना म्हणते, इश्कबाजमध्ये नकुल मेहता माझा सर्वांत मोठा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 4:10 AM

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका इश्कबाजने नेहमीच आपल्या प्रेक्षकांना प्रमुख जोडी शिवाय आणि अन्निका नकुल मेहता आणि सुरभि चंदना यांची ...

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका इश्कबाजने नेहमीच आपल्या प्रेक्षकांना प्रमुख जोडी शिवाय आणि अन्निका नकुल मेहता आणि सुरभि चंदना यांची उत्तम ऑनक्रीन केमिस्ट्री दिली आहे.ह्या दोघांची ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीनही खूप छान केमिस्ट्री आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये ते हिट आहेत.नकुल आणि सुरभि यांचे त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर लाखो फॉलोअर्स असून त्यावरील त्यांच्या बिहाईंड दि सीन्स फोटोजमधून त्यांची सेटवरील धमाल दिसून येते. याबद्दल सुरभि चंदना म्हणाली, “नकुल आणि माझी मैत्री सुरूवातीपासूनच खूप छान असून आता ती आणखी दृढ झाली आहे. माझ्यासारख्या नवअभिनेत्रीसाठी ही इंडस्ट्री समजून घेण्यासाठी नकुलच माझा सगळ्‌यात मोठा आधार होता. मी त्याचे जितके आभार मानावेत तेवढे कमी आहेत.” लोकप्रिय बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता निकितिन धीर सध्या स्टार प्लसवरील शो इश्कबाजमध्ये खलनायकाची भूमिका साकारत असून त्याच्या मते त्याची शरीरयष्टी असाधारण असली तरी त्याला इंडस्ट्रीमध्ये चांगले काम मिळाले आहे.बॉलिवूडमध्ये 'दबंग', 'चेन्नई एक्सप्रेस','हाऊसफूल'अशा चित्रपटांमध्ये आपल्या खलनायकी व्यक्तिरेखांसाठी ओळखला जाणारा निकितिन म्हणतो की इंडस्ट्रीमध्ये कामाच्या बाबतीत तो नेहमीच भाग्यवान ठरला आहे आणि त्याची असाधारण शरीरयष्टी खरंतर त्याच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.निकीतीन धीरच्या पर्सनल लाईफच्याही खूप चर्चा होत असतातनिकितीन धीरने टीव्ही अभिनेत्री क्रतिका सेनगरसह लग्न केले आहे.दोघेही छोट्या पडद्यावर काम करत असल्याने त्यांना मालिकेच्या चित्रीकरणात ते बिझी असतात त्यामुळे त्या दोघांना एकमेकांना वेळ देता येत नाही.पण या दोघांनीही आपल्या कामातून वेळ काढून लग्नाचा वाढदिवस चांगला साजरा करण्याचे ठरवले आहे. ते दोघे नुकतेच युरोपला फिरायला गेले आहेत.तिथेच ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत.