कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील प्रेक्षकांची दोन लाडके व्यक्तिमत्व येणार आहेत. संगीतातल्या गुरु शिष्यांच्या या जोडीने गोड गाणी सादर केली आहेत आणि बिंदास भाष्यानी कार्यक्रमाला रंगत आणली आहे. या कार्यक्रमामध्ये ही जोडी जुन्या गोड आठवणी देखील सांगणार आहेत. तसेच काही किस्से आणि गोष्टीदेखील प्रेक्षकांना कळणार आहेत. म्हणजेच स्वरसम्राट पं.सुरेश वाडकर आणि अष्टपैलू अवधूत गुप्ते संगीत क्षेत्रातील गुरु शिष्याची ही जोडी म्हणजेच दोन कोल्हापूरकर रंगवणार या कार्यक्रमामध्ये खुमासदार गप्पा. 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'चा हा विशेष भाग येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सुरेश वाडकर यांनी बऱ्याच जुन्या आठवणी सांगितल्या. ज्यामध्ये सुरेशजींनी त्यांची आणि पंचमदांची एक आठवण सांगितली. तसेच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांच्या लग्नाबद्दलची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती त्यावर ते म्हणाले, “मी लग्नाची मागणी घातलेली मला नाही आठवत. कुठून ही चर्चा सुरु झाली कुणास ठाऊक पण, असे झाले असते तर चांगले झाले असते,” असे ते म्हणाले.
अवधूत गुप्तेने देखील 'झेंडा' सिनेमा दरम्यानची आठवण सांगितली. झेंडा सिनेमा रिलीज झाल्यावर माझ्या कुटुंबाला मला भूमिगत करायला लागल होतं... मी आणि माझी बायको देखील मुंबईहून दूर गेलो होतो. त्यावेळेस एका पत्रकाराने केलेली बातमी वाचून मला माझ्या बायकोच्या सेलवर एक फोन आला आणि तो होता बाळासाहेब ठाकरेंचा. आणि ते म्हणाले “तुझ्यासोबत बाळासाहेब उभा राहील.एका कार्यकर्त्याला वा माणसाला आयुष्यभराच विकत घेण्यासाठी एक फोन पुरेसा असतो असं मी म्हणेन ... असं काय घडलं होत ? का बाळासाहेबांनी फोन केला ? काय होती ती बातमी ? हे जाणून घेण्यासाठी आगामी भाग नक्की पाहा.