बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)चा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि वहिनी चारू असोपा (Charu Asopa) यांचे नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. करवा चौथ 2022 च्या निमित्ताने, जिथे बाकीचे जोडपे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले, तिथे अभिनेत्री चारू असोपा हिने तिच्या पतीबद्दल असा खुलासा केला, ज्यानंतर तिचे चाहते पुन्हा एकदा चिंतेत पडले.
काय आहे पूर्ण प्रकरण?राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या नात्यात आलेला दुरावा कुणापासून लपलेला नाही. ब्रेकअप आणि नंतर पॅचअपच्या बातम्या रोजच चर्चेत असतात. हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते पण नंतर मुलीसाठी दोघेही एकत्र आले. आता करवा चौथच्या दिवशी चारु आणि राजीव यांचा एकही फोटो समोर आला नाही, त्यावरुन विविध अंदाज बांधले जाऊ लागले. यादरम्यान चारू आणि राजीव यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, चारू असोपाने एचटी सिटीशी संवाद साधताना खुलासा केला की, तिने कोणालाही अनफॉलो केलेले नाही, पण राजीवने तिला ब्लॉक केले आहे. टीव्ही अभिनेत्री म्हणाली, 'तो दिल्लीला गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने मला ब्लॉक केले. राजीव कुठे आहे आणि काय करत आहे याची मला कल्पना नाही. आम्ही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही यासाठी संधी दिली होती पण मला वाटत नाही हे प्रकरण सुटेल.
या सगळ्याशिवाय राजीवने पत्नी चारूसोबत पोस्ट केलेले फोटोही त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून डिलीट केले आहेत. त्याचप्रमाणे चारूच्या इन्स्टा पेजवर राजीवसोबतचा एकही फोटो दिसत नाही.