Join us

क्रांती प्रकाशला पाहताच आवाक झाले स्वामी रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 7:22 AM

डिस्कव्हरी जीतवरील बायोपिक सीरीज स्वामी रामदेवः एक संघर्षने देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे अभिनेता क्रांती प्रकाश झा दिसायला अगदी ...

डिस्कव्हरी जीतवरील बायोपिक सीरीज स्वामी रामदेवः एक संघर्षने देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे अभिनेता क्रांती प्रकाश झा दिसायला अगदी रामदेव बाबांसारखा असून तो त्यांच्याप्रमाणेच योगासने देखील अगदी सहजपणे करू शकतो. त्यामुळेच या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकेत रामदेव बाबांचा सर्वसामान्य मुलगा ते जागतिक आयकॉन असा दीर्घ प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण करत आहे.रामदेवः एक संघर्ष या मालिकेसाठी क्रांती प्रकाश झाची निवड करण्याबाबत अजय सांगतो, आम्हाला या मालिकेसाठी स्वामी रामदेव यांच्यासारखा दिसणारा आणि त्यांच्यासारखे हावभाव अगदी उत्तमपणे करू शकणाऱ्या कलाकाराचा शोध होता.क्रांतीला पाहिल्यावर तोच या भूमिकेसाठी योग्य असल्याची आमची सगळ्यांचा खात्री पटली. वास्तविक आयुष्यातील व्यक्ती पडद्यावर साकारणे सोपे नसते.त्यामुळेच क्रांती त्याचा अभिनय अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.cnxoldfiles/a>स्वामी रामदेव यांनी क्रांती यांना मदत करण्यासाठी केवळ त्यांच्यासोबत वेळच व्यतीत केला नाही तर आपल्या स्वतःच्या खडावासुद्धा क्रांती प्रकाश झा यांना भेट म्हणून दिल्या.जे ते ह्या शोसाठीसुद्धा वापरत आहेत.ह्याबद्दल क्रांती प्रकाश झा म्हणाला, “मला माहिती आहे की स्वामी रामदेव यांची व्यक्तिरेखा साकारणे ही आयुष्यातील एकमेव संधी आहे आणि ह्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे.हरिद्वार येथे स्वामी रामदेव यांच्यासोबत व्यतीत केलेला समय मी कधीच विसरू शकणार नाही. मी शिकलो अनेक गोष्टी स्वतःवर बिंबवल्या - मी तिथे ती सगळी ऊर्जा आत्मसात करण्यासाठी, त्यांचे बारकावे ऑनस्क्रीन अचूकपणे साकारण्यासाठी शिकण्यासाठी गेलो होतो. जेव्हा त्यांनी मला त्यांच्या खडावा भेट म्हणून दिल्या तेव्हा तर मी खूपच खुश झालो.त्या खडावा मी चित्रीकरणासाठीही वापरत आहे.”स्वामी रामदेवः एक संघर्ष ही एक स्क्रिप्टेड बायोपिक सीरीज असून यातून स्वामी रामदेव यांची ह्याआधी कधीही न पाहिलेली प्रेरणादायी कथा पाहायला मिळेल.एका अज्ञात व्यक्तीपासून एक नावाजलेले योग गुरू, व्यवसाय नेता आणि राष्ट्रीय आयकॉन बनण्यापर्यंतचा प्रवास यात रेखाटण्यात येईल. वॉटरगेट प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ह्या शोमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता नमन जैन हा रामकिशन (तरूण रामदेव) आणि क्रांती प्रकाश झा हे स्वामी रामदेव यांच्या भूमिकेत झळकणार आहे.