Join us

लगीन घाई...! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या लग्नाची तारीख आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 4:23 PM

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. एकामागून एक लग्न सोहळे साजरे होत आहेत. सुरूची अडारकर-पियुष रानडे, अमृता देशमुख-प्रसाद जवादेनंतर आता मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे २१ डिसेंबर, २०२३ ला विवाहबंधनात अडकले. दरम्यान आता स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. एकामागून एक लग्न सोहळे साजरे होत आहेत. अनेक अभिनेते, अभिनेत्री बोहल्यावर चढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरूची अडारकर-पियुष रानडे, अमृता देशमुख-प्रसाद जवादे यांनी नुकतेच लग्न केले आहे. त्यानंतर आता सारेगमप लिटिल चॅम्प्सचे मॉनिटर आणि मोदक म्हणजेच मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे २१ डिसेंबर, २०२३ ला विवाहबंधनात अडकले. दरम्यान आता स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे. लग्नाच्या आधीच्या रिती रिवाजाला सुरूवात झाली आहे. ते दोघे २५ डिसेंबरला विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नाच्या तयारीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोत घराबाहेर सजावट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आशिषने पार्लरमध्ये जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आशिषला 'इंडियन आयडॉल १२'मधून लोकप्रियता मिळवली आहे. आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायलीत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय.

स्वानंदी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आभाळमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. झी मराठीच्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेतून सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकली होती.  

टॅग्स :स्वानंदी टिकेकर