Join us

Tu Tevha Tashi : अरे काही काय दाखवता...!  ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील नवा ट्रॅक पाहून संतापले प्रेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 12:36 PM

Tu Tevha Tashi : अनेकदा मालिकेतील बदल, मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडत नाहीत आणि मग मालिका ट्रोल होतात. सध्या अशीच एक मालिका ट्रोल होतेय. होय, ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत.

छोट्या पडद्यावरच्या मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. पण अनेकदा मालिका ट्रोलही होतात. अनेकदा मालिकेतील बदल, मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडत नाहीत आणि मग मालिका ट्रोल होतात. सध्या अशीच एक मालिका ट्रोल होतेय. होय, ‘तू तेव्हा तशी’  (Tu Tevha Tashi) या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत.

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेमध्ये स्वप्नील जोशी (Swapnil Joshi)आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेत स्वप्नील जोशी सौरभची भूमिका साकारतोय आणि शिल्पा तुळसकर अनामिकेच्या भूमिकेत आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफूल प्रेमकहाणी मालिकेत पहायला मिळतेय. मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत  चाहत्यांच्या पसंतीत उतरली. पण तूर्तास मालिका ट्रोल होतेय. कारण आहे कावेरी.

मालिका लोकप्रिय होत असताना त्या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सौरभ आणि अनामिका यांची प्रेमकहाणी चांगलीच बहरतेय. पण  याचदरम्यान मालिकेमध्ये  अनामिकेची आई कावेरी हिची एन्ट्री झाली आहे आणि कावेरी मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करताना दिसत आहेत.अलीकडे एका सीनमध्ये  सौरभला भेटून अनामिका घरी येते अन् कावेरी तिच्या अंगावर गोमूत्र शिंपडते. प्रेक्षकांचा हा सीन चांगलाच खटकला आहे. अनेक प्रेक्षकांनी यावर टीका केली आहे. अनामिका आणि सौरभच्या नात्याबद्दल कावेरी राधाचे कान भरते, हेही प्रेक्षकांना पटलेलं नाहीये. याचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.

‘मी ही मालिका शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील या जोडीसाठी बघतेय पण नेहमी प्रमाणे ‘झी’वाल्यानी तेच केलं. चांगला ट्रॅक चालू होता. ज्या लीडला तुम्ही आधी एकटी बिनधास्त सेल्फ डिपेन्ड दाखवलंत तिलाच आत्ता अशी दाखवताय.   कोणती आई चाळीशीतल्या मुलीशी अशी वागते मुर्खांचा  बाजार. हा ट्रॅक बदला नाहीतर लोक बघणं बंद करतील,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

‘काम नाहीत म्हणून स्टोरी लिहिता का रे की लोकांना वेड्यात काढता,’ असा संतप्त सवाल एका युजरने केला आहे. ‘अरे एवढे दिवस तर मला कोण नाही... मी स्वतंत्र... कोणाचीच न ऐकणारी हिरोईन दाखवली... अन् आत्ता कुठून टपकली ही आई तिची. जरा तर डोकं लावायचं स्टोरी लिहितांना... काहीही दाखवता,’ अशा शब्दांत एका युजरने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘या बाई ला बाहेर काढा प्लीज हिच्या मुळे बघवत पण नाही का आणलीये ही बाई? डोक्याला ताप आहे कुठल्या जमान्यात राहते. त्या अनामानिकाचा सासुला काय बोलते उलट तिनेच तर सांभाळ केला अनामिकाचा आणि राधाचा. तिचा मुलगा छळ करत होता अनामिकाचा’,अशी कमेंट एका युजरने केली आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीझी मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार