Join us

"महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्यानंतर..."; प्राजक्ता गायकवाडने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:34 IST

प्राजक्ता गायकवाडने छ. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर गेल्यावर काय घडलं, याचा अनुभव शेअर केलाय (prajakta gaikwad)

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका (swaraja rakshak sambhaji) चांगलीच गाजली. झी मराठीवर ही मालिका सुरु होती. डॉ. अमोल कोल्हेंनी (dr amol kolhe) या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. याशिवाय याच मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (prajakta gaikwad) महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर प्राजक्ताला सर्वजण महाराष्ट्रात येसूबाईंच्या रुपात ओळखू लागले. नुकतंच एका मुलाखतीत प्राजक्ताने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्यानंतर आलेला विलक्षण अनुभव शेअर केलाय.

प्राजक्ताने सांगितला खास अनुभव

जयंती वाघमारे यांना दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता गायकवाड म्हणाली की, "मला असं थोडंसं एकटं वाटत होतं. तेव्हा मला ते म्हणाले की, तुम्हीच खचल्या तर कसं व्हायचं. तुम्ही महाराणी येसूराणी साहेबांची इतक्या ताकदीची भूमिका साकारली आहे. त्या एवढ्या स्ट्राँग होत्या आणि तुम्ही त्यांची भूमिका साकारली आहे म्हटल्यानंतर तुम्ही तर अजून स्ट्राँग असायला पाहिजे. हे एवढंसं वाक्या मूड चेंज करायला मला हेल्पफुल ठरलं."

"संभाजी महाराजांच्या समाधीवर आताच बलिदान मास झाला तेव्हा वढू बुद्रुकला जाऊन आले. महाराजांच्या समाधीवर नुसतं डोकं ठेवलं तरी अंगावर काटा येतो. म्हणजे इतकी एनर्जी त्या समाधीस्थळी आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की, नाही आता सगळं सपलंय आयुष्यातलं तर उठा आणि वढू तुळापूरला जाऊन या. समाधीस्थळावर जाऊन फक्त डोकं टेकून या. तुम्हाला ती एनर्जी परत मिळेल. " प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतेय.

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडटेलिव्हिजनस्वराज्य रक्षक संभाजीडॉ अमोल कोल्हे'छावा' चित्रपट