Swayamvar Mika Di Vohti : आपल्या गाण्याच्या तालावर लोकांना पाय थिरकायला लावणारा सिंगर मिका सिंगचे (Mika Singh) चाहते भारतातच नाहीत तर जगभरात पसरले आहेत. आपल्या या तमाम चाहत्यांना मिका लवकरच एक खूशखबर देणार आहे. होय, मिका सिंग लवकरच लग्न करतोय आणि आणि त्यासाठी त्याने स्वत:चं स्वयंवर थाटलं आहे. ‘मिका दी वोटी’ या शोद्वारे तो आपली ‘दुल्हनिया’ निवडणार आहे.देशभरातील अनेक तरूणी मिकाची दुल्हनिया व्हायला या शोमध्ये आल्या होत्या आणि आता हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. शोमध्ये आता फक्त चार राजकुमारी उरल्या आहेत आणि यापैकी एक मिकाची राणी बनणार आहे. चर्चा खरी मानाल तर, मिकाने निवडलेल्या या राणीच्या नावाचा खुलासा झाला आहे.
आकांक्षा पुरीने जिंकला शो..?मीडिया रिपोर्टनुसार, ‘मिका दी वोटी’ हा शो अभिनेत्री आकांक्षा पुरीने (Akanksha Puri) जिंकला आहे. आकांक्षा पुरी ही मिकाची जुनी मैत्रिण आहे. मध्यंतरी दोघांच्या रिलेशनशिपच्या आणि लग्नाच्या अफवाही चर्चेत होत्या. आकांक्षा पुरीला याबद्दल विचारले असता, तिने काहीही बोलण्यास नकार दिला. शो टेलिकास्ट होईपर्यंत मी काहीही बोलू शकत नाही. मी कॉन्ट्रक्ट साईन केला आहे, असं बॉलिवूड लाईफशी बोलताना ती म्हणाली.आकांक्षाने वाईल्ड कार्ड म्हणून शोमध्ये एन्ट्री घेतली होती. मी मिकाची 10 ते 12 वर्षांपासून मैत्री आहे. मिकाला अन्य मुलींसोबत बघून माझा फार जळफळाट झाला होता. त्याक्षणी मी मिकावर प्रेम करते, याचा साक्षात्कार मला झाला आणि मी शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असं आकांक्षाने सांगितलं होतं.
मिका लगेच करणार नाही लग्न?स्वयंवर सुरू होण्याआधी, मी लगेचच लग्न करणार नाही, असं मिकाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मिका आधी एन्गेजमेंट करेल, यानंतर एकमेकांना समजून घेऊन निवडलेल्या मुलीशी लग्न करेल, असं कळतंय.