Join us

तारक मेहता का उल्टा चष्मामधील या कलाकाराकडे एकवेळ झोपण्यासाठी नव्हते अंथरुण, आज घेतलंय करोडोचे घर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:56 AM

या कलाकाराची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. पण काहीही झालं तरी मुंबईत माझं घर घेणार असे त्याने पक्कं ठरवलं होते.

ठळक मुद्देसमयने एक साक्षात्कार या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी अभिनयक्षेत्रात संघर्ष करत असताना आमच्या घरची परिस्थिती खूपच वाईट होती. आमच्याकडे झोपण्यासाठी अंथरुणंदेखील नसायची.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, अब्दुल, टप्पू, सोनू, गोली, गोगी या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत गोगीच्या भूमिकेत आपल्याला समय शाहला पाहायला मिळते. समय या मालिकेचा सुरुवातीपासूनचा भाग आहे. पण या मालिकेत काम करण्याआधी समयची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्याच्या घरात झोपण्यासाठी अंथरुणं देखील नव्हती. पण आज त्याने करोडोचे घर मुंबईत घेतले आहे. समयनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.

समयने एक साक्षात्कार या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी अभिनयक्षेत्रात संघर्ष करत असताना आमच्या घरची परिस्थिती खूपच वाईट होती. आमच्याकडे झोपण्यासाठी अंथरुणंदेखील नसायची. आम्ही जमिनीवर झोपायचो. पण एक दिवस मी मुंबई शहरात स्वतःचं घर घेणार असे मी पक्कं ठरवलं होते. अनेक वर्षांनंतर माझे हे स्वप्न पूर्ण झाले.

समयने या मुलाखतीत पुढे सांगितले की, मुंबईत घर घेण्याचे माझे स्वप्न काहीच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. घर घेतल्यानंतर मी प्रचंड खूश झालो होतो. माझे पालक आता एका चांगल्या घरात राहातात, त्यांना सगळ्या सोयी-सुविधा मिळतात हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, समय शाह तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करण्याचे प्रत्येक दिवसाचे आठ हजार रुपये घेतो. त्याने काही वर्षांपूर्वी दीड करोडचे मुंबईत घर घेतले आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा