Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' अडचणीत आला आहे. गेल्या काही काळात या शोमधील अनेक कलाकारांनी शोला अलविदा केले आहे. दिशा वकानी आणि शैलेश लोढा यांसारख्या बड्या कलाकारांनंतर आता तारक मेहताचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही शो सोडला आहे.
14 वर्षांनंतर शो सोडलामालव राजदा गेल्या 14 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या शोचे दिग्दर्शन करत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक वर्षांच्या प्रवासानंतर त्यांनी हा शो सोडला आहे. त्यांचा हा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालव राजदाने तारक मेहता शोचे शेवटचे शूटिंग 15 डिसेंबरला केले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, मालव राजदा आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये मतभेद झाले होते, ज्यामुळे त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, मालव राजदा यांनी या सर्व शंकांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मालव राजदा म्हणाले, तुम्ही चांगले काम करत असाल, तर मतभेद होणे सामान्य गोष्ट आहे. प्रॉडक्शन हाऊससोबत माझे कोणतेही मतभेद नाहीत. मी शो आणि असित भाई (शोचे निर्माते) यांचा आभारी आहे.
शो का सोडला?मालव राजदाने शो का सोडला? या प्रश्नावर ते म्हणाले, 14 वर्षे हा शो केल्यानंतर मला वाटले की, मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये अडकलो आहे. मला असे वाटते की स्वत: ला विकसित करण्यासाठी पुढे जाणे आणि स्वतःला आव्हान देणे आवश्यक आहे. ही 14 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे होती. या शोमधून मला केवळ प्रसिद्धी आणि पैसाच मिळाला नाही तर माझी जीवनसाथी प्रियाही मिळाली आहे.