'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) या मालिकेत बबिता अय्यरच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) रविवारी मुंबईत आयोजित 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स' (ITA) मध्ये हजेरी लावली. मुनमुन नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. पण यावेळी अभिनेत्री एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये मुनमुन बबिता जीच्या भूमिकेत साकारताना दिसते आहे. तिची आणि जेठालालची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. रविवारी मुंबईतील फिल्मसिटी येथे 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स' (ITA) आयोजित करण्यात आला होता. या फंक्शनच्या रेड कार्पेटवर मुनमुन ब्राइट निऑन ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.
मुनमुन रेड कार्पेटवर आल्यानंतर मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर आली. सुरुवातीला तिचा मूड चांगला होता, पण अचानक ती संतापली, मागे असलेल्या फोटोग्राफर्सकडे पाहून ती म्हणाली, 'जे लोक मागून कमेंट करत आहेत, ते नंतर त्यांच्या व्हिडिओमध्ये ऐकायला येते, त्यांनी कमेंट करणे थांबवा. मागून कमेंट करणारे मूर्ख असतात.
मुनमुनने असं काय ऐकलं, ज्यामुळे ती इतकी संतप्त झाली, हे फक्त अभिनेत्रीलाच माहीत आहे. पण काही कमेंटमुळे ती चांगलीच संतापली हे नक्कीच.