'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन कौर सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिची छोटी बहीण व्हेंटिलेटरवर जीवन आणि मृत्यूची लढाई लढत आहे. अशा परिस्थितीत बहिणीची काळजी घेण्यासाठी तिला तिच्या घरी जावं लागलं आहे. तिच्याकडे सध्या काही काम देखील नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'तारक मेहता' फेम जेनिफर तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींमधून जात आहे. अभिनेत्री म्हणाली की, "माझ्या लहान बहिणीची प्रकृती गंभीर आहे. म्हणूनच मी माझ्या गावी आले आहे. ती व्हेंटिलेटरवर आहे आणि यावेळी तिला माझी सर्वात जास्त गरज आहे. तिची प्रकृती बरीच नाजूक आहे. ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत मला तिच्यासोबत राहायचं आहे."
"ती गेल्या दीड वर्षांपासून कठीण जीवन जगत आहे. माझ्या लहान भावाच्या मृत्यूनंतर मी माझ्या माहेरच्या घरातील सात मुलींचा सांभाळ करत आहे. याच दरम्यान असित मोदी प्रकरण झालं. सर्व गोष्टी एकत्र सांभाळणे माझ्यासाठी खूप अवघड होतं. त्यामुळे गेले काही महिने माझ्यासाठी त्रासदायक होते."
"'तारक मेहता' सोडल्यानंतर तिला आतापर्यंत कोणत्याही भूमिकेची ऑफर आली नाही. पण एक प्रोडक्शन हाऊस आहे, जे माझ्यासारख्या पात्राच्या शोधात आहे. कदाचित ते लोक शोसाठी संपर्क साधतील."
काही काळापूर्वी जेनिफरने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्याविरोधात सेक्शुअल हॅरेसमेंट केस जिंकली होती. न्यायालयाने असित मोदी यांना पाच लाख रुपये भरपाई देण्यास सांगितले आहे, मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम मिळालेली नाही.
मला 5 लाख रुपयांसाठी 17 एप्रिलपर्यंत थांबण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, असित मोदींकडून माझे पैसे देखील वसूल करायचे आहे, जे अंदाजे 25 लाख रुपये आहेत असं देखील अभिनेत्रीने म्हटलं आहे.