Join us

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : नट्टू काकांना ओळखणंही मुश्किल, कॅन्सरच्या उपचारानंतर अशी झाली अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:07 AM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Nattu Kaka Pictures Goes Viral: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील नट्टू काका अर्थात अभिनेते धनश्याम नायक यांचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठळक मुद्दे‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 13 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि तेव्हापासून घनश्याम नायक हेही या शोचा भाग आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या लोकप्रिय मालिकेतील नट्टू काका  (Nattu Kaka)अर्थात अभिनेते धनश्याम नायक (Ghanshyam Nayak) सध्या कॅन्सरला झुंज देत आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात घनश्याम यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता नट्टू काकांचे काही फोटो व्हायरल आले आहेत आणि हे फोटो पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे. होय, फोटोत नट्टू काकांना ओळखणंही मुश्किल आहे. हेच आपले नट्टू काका आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नट्टू काकांच्या चेह-यावर आजारपणाच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. मात्र तरीही ओठांवर हास्य आहे. फोटोत ते एका चाहत्सासोबत दिसत आहेत. त्यांनी पांढ-या रंगाचा कुर्ता आणि पायजामा घातला आहे.  

 

नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी काम करत राहिल. चेह-यावर मेकअप लागलेला असतानाच मला मरण यावे, अशी माझी शेवटची इच्छा आहे, असे ते म्हणाले होते.

घनश्याम नायक यांना वयाच्या 63 व्या मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  ही मालिका मिळाली. 350 सिनेमांमध्ये काम करूनही त्यांला जी ओळख मिळाली नाही, तर या मालिकेने दिली.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 13 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि तेव्हापासून घनश्याम नायक हेही या शोचा भाग आहेत. यादरम्यान संजय लीला भन्साळी आणि करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसनेही त्यांना रोल ऑफर केले होते. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. कारण नट्टू काका ही त्यांची सर्वाधिक आवडीची भूमिका आहे. 

 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा