Join us  

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Sonu Bhide : बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असलेली भिडे मास्तरांची 'सोनू' म्हणजेच Nidhi Bhanushali पुन्हा 'तारक मेहता..' मध्ये दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 8:13 PM

निधी आपल्या हॉट अन् बोल्ड फोटोंमुळे नेहमी तरूणाईच्या चर्चेचा विषय ठरते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Sonu Bhide : तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो गेले कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवतोय. या मालिकेत अनेक अभिनेते-अभिनेत्री वर्षानुवर्षे काम करत आहेत. पण काहींनी मात्र हा शो काही काळ काम करून नंतर सोडल्याचे दिसलं. मालिकेतील दया बेन म्हणजेच दिशा वाकानी, अंजली मेहता म्हणजे नेहा मेहता किंवा टप्पू म्हणजेच भाव्य गांधी यांनी बराच काळ या मालिकेत अभिनय केला आणि काही वर्षांपूर्वी आपापल्या वैयक्तिक कारणांमुळे मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. अशीच एक आणखी अभिनेत्री म्हणजे निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) . कॉलेजवयीन सोनू भिडेचं पात्र निधीने खुबीने वठवलं. पण काही वर्षांत तिने ही मालिका सोडली. ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते. त्यामुळे ती पुन्हा तारक मेहतामध्ये दिसणार का? असा सवाल अनेकांनी तिला विचारला. त्याचं तिने उत्तर दिलं.

निधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप अँक्टीव्ह असते. ती सतत वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देत असते. त्यापैकीच एका पर्यटन स्थळाचे काही फोटो तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर ठेवले. आणि एका स्टोरीमध्ये चाहत्यांना तिला प्रश्न विचारण्यास सांगितलं. त्यानंतर अनेकांनी तिला अपेक्षेप्रमाणे तारक मेहता या मालिकेत पुन्हा दिसणार का, असा सवाल केला. त्याचं निधीने अगदी नम्रपणे आणि स्पष्ट शब्दात 'नाही' असं उत्तर दिलं. (Nidhi Bold Bikini Photos)

इन्स्टास्टोरीवर तिने आधी तो प्रश्न पोस्ट केला आणि त्याखाली उत्तर दिलं. तिने लिहिलं की मला खूप जणांनी हाच प्रश्न विचारला आहे की मी परत त्या शो मध्ये दिसणार का? पण माझं त्यावर उत्तर आहे की मी त्या मालिकेत परत काम करणार नाही. मला त्या मालिकेत काम करताना तुम्हा चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं. त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. पण मी आता पुन्हा तारक मेहता... मध्ये काम करताना दिसणार नाही!

पुढे तिने लिहिलं की, मी मोठी होताना एक गोष्ट शिकले आहे की एखादी गोष्ट कितीही आरामदायी किंवा मोठी असली तरीही जर तुम्हाला दुसरी एखादी मोठी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी आधी जिथे आहात तिथून बाहेर पडावंच लागतं. तारक मेहता... मधला माझा प्रवास तेव्हाच संपला आणि त्यानंतर एका नव्या प्रवासाला सुरूवातही झाली आहे. आता माझ्या नव्या प्रवासात तुम्ही सारे मला पाठिंबा द्याल आणि माझ्यावर तितकंच प्रेम कराल अशी मला आशा आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीइन्स्टाग्राम