Join us  

बेडरूम फोटोमुळे ट्रोल झाली 'तारक मेहता'मधील रिटा, म्हणाली...मी कशी ते तुम्ही ठरवू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 9:41 AM

अभिनेत्री प्रिया आहूजा राजदा 'तारक मेहता का उल्ट चष्मा' टेलिव्हिजन मालिकेतील रिटा रिपोर्टरच्या भूमिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली.

अभिनेत्री प्रिया आहूजा राजदा 'तारक मेहता का उल्ट चष्मा' टेलिव्हिजन मालिकेतील रिटा रिपोर्टरच्या भूमिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. आपल्या भूमिकेनं तिनं स्वत:ची ओळख निर्माण केली. तिची फॅनफॉलोइंग देखील प्रचंड वाढली. पण प्रिया आहूजाला सध्या तिच्या कपड्यांवरुन ट्रोल केलं जाण्याचंही प्रमाण वाढलं आहे. यावेळी प्रियानं ट्रोलर्सना जशास तसं उत्तर दिलं आहे. 

प्रिया आहूजानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत सविस्तर पोस्ट लिहून ट्रोलर्सची कानउघडणी केली आहे. "ज्यांनी माझ्या लेटेस्ट फोटोंवरुन ट्रोल केलं आहे त्यांना मी सांगू इच्छिते की मला यानं काहीच फरक पडत नाही की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. तुमच्यापैकी बरेच जण माझ्या पतीला टॅग करुन मी कशापद्धतीची पत्नी आहे आणि मला असे कपडे परिधान करण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते याबाबत प्रश्न विचारत आहात. तर काहींनी माझ्या मुलाबद्दलही लिहिलं आहे की अरदास आपल्या आईबद्दल काय विचार करेल आणि एक आई म्हणून मी माझ्या मुलाला काय संस्कार करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्याबाबतचे निर्णय माझा पती आणि मुलांनाच घेऊ द्यात. मी कशापद्धतीची पत्नी आणि आई आहे याचा निर्णय ते घेतील", असं प्रिया आहूजानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

"मी कोणते कपडे घालावेत याची परवानगी तुमच्याकडून घेण्याची मला काहीच गरज नाही. मला काय परिधान करायचं आहे हे फक्त मी स्वत: ठरवणार आणि मला कशापद्धतीनं जगायचं आहे याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. तुमच्या सल्ल्याची मला अजिबात गरज नाही", असंही प्रियानं म्हटलं आहे. 

प्रिया आहूजा का झाली होती ट्रोल?काही दिवसांपूर्वी प्रिया आहूजानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बेडरुम फोटो शेअर केले होते. बेडवर फक्त एका काळ्या मखमली कपड्यात प्रिया आहूजानं फोटोशूट केलं होतं. हे सिजलिंग फोटोशूट प्रियानं एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी केलं होतं. प्रियानं जसे हे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले तसं लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्रियानंही ट्रोलर्सना जशास तसं उत्तर दिलं आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा