Join us

"तेव्हा लोकांनी नावं ठेवली आणि आता...", 'तारक मेहता' फेम माधवी भिडेचं कठीण काळावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:37 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे.  

Sonalika Joshi: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकार सुद्धा प्रेक्षकांना आता आपलेसे वाटू लागले आहेत. त्यावरून या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. दरम्यान, या मालिकेतील दया, जेठालाल, चंपकदादा, टप्पू सेना, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभीसह शोमधील सर्वच पात्रं प्रेक्षकांच्या घराघरांतील एक अविभाज्य भाग बनले आहेत. मालिकेत अभिनेत्री सोनालिका जोशी पहिल्या भागापासून माधवी भाभीचे पात्र साकारत आहेत. आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधवीची ही सोज्वळ गृहिणीची भूमिका साकारुन अभिनेत्री घराघरात पोहोचली. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे सोनालिका जोशी सध्या चर्चेत आली आहे.

नुकतीच सोनालिका जोशीने 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री मनमोकळेपणाने गप्पा मारल्या शिवाय अनेक गोष्टींचे खुलासे केले. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "काही लोकांनी मला नावंही ठेवली की हिने आता लीड सिरिअल केली आणि आता एवढसं करते. पण माझ्याकडे काम नव्हतं मला हे आवडलं मला हे करायचं असं म्हणून मी करत गेले. मी काय असं ठरवून आलेच नव्हते. मग अखेर २००८ मध्ये मला ही मालिका मिळाली आणि त्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं."

पुढे अभिनेत्रीने सांगितंलं, "मी आयुष्यात जे काही केलं ते मनापासून केलं. शिवाय मला जे काही मिळालं ते सुंदर आणि छान मिळालं. म्हणजे आता शांतपणे बसून मला काही आठवलं की, मला बरं वाटतं. लोकांना जसं अपेक्षित असतं तसं काम आपण केलं. मी लक्ष्मीकांत बेर्डे तसेच विक्रम गोखले, शरद पोंक्षे, अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर तसेच आनंद अभ्यंकर, शैलेश दातार या कलाकारांसोबत काम केलं."

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसेलिब्रिटी