Join us

'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने पूर्ण केले ३२०० हॅप्पीसोड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 11:21 AM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' विनोदी मालिका १३ वर्षांपासून हास्य, प्रेम आणि मनोरंजनाचा प्रसार करीत हा शो आज निःसंशयपणे देशाचा सर्वाधिक आवडता फॅमिली शो बनला आहे.

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.या मालिकेने  ३२०० हैप्पीसोड्स पूर्ण करत नवीन टप्पा गाठला आहे. १३ वर्षांपासून हास्य, प्रेम आणि मनोरंजनाचा प्रसार करीत हा शो आज निःसंशयपणे देशाचा सर्वाधिक आवडता फॅमिली शो बनला आहे. 

हा भारतातील एकमात्र फॅमिली टीव्ही शो आहे जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करीत आहे. या यशाचे श्रेय शो शी संबंधित भारतीय सोसायटीलाही जाते जे शोच्या कथांमधून आणि पात्रांमधून दर्शकांपुढे मांडले जाते. म्हणूनच या शो मधील गोकुळधाम सोसायटी आज इतकी प्रसिद्ध झाली आहे कि ती 'मिनी इंडिया' म्हणून ओळखली जाते. तारक मेहता का उल्टा चष्मा असित कुमार मोदी द्वारा लिखित आणि निर्मित आहे.

 "गेल्या वर्षापासून लॉकडाऊनमुळे शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि आम्ही बरेच चढ-उतार पहिले. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची कलाकार आणि क्रूची वचनबद्धता वाखाणण्याजोगी आहे आणि त्यामुळेच आज हा शो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा शो ला प्रेक्षक, प्रशंसक आणि समर्थकांकडून मिळालेले प्रेम आणि समर्थन याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. हास्य, आनंद आणि सकारात्मकतापूर्ण कथा दाखवण्याची प्रेरणा आम्हाला आमच्या प्रेक्षकांच्या आणि प्रशंसकांच्या प्रेमामुळेच मिळते," तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माता असित कुमार मोदी म्हणतात.

 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या टीमसाठी हा प्रसंग खास बनला तो कार्यक्रमाच्या एका चाहत्याने भेट म्हणून पाठविलेल्या एका सुंदर स्मृतिचिन्हामुळे. या शिल्पकाराने एका काचेच्या बाटलीत गोकुळधाम परिवाराची फोटो फ्रेम कुशलतेने स्थापित करून ती असित कुमार मोदींना भेट केली आहे. एवढेच नव्हे तर या शिल्पकाराने असितजींना श्री गणेश आणि श्री हनुमानाची मूर्ती ही भेट दिली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा २८  जुलाई, २००८ रोजी प्रथमच सब टीव्ही, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियावर प्रसारित झाला होता. हा कार्यक्रम मराठीत गोकुळधामची दुनियादारी आणि तेलुगू भाषेत तारक मामा अय्यो रामा म्हणून युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा