'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 03:13 PM2021-05-17T15:13:27+5:302021-05-17T15:20:25+5:30

आज दिलीप जोशी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीत गणले जातात.

Taarak mehta ka ooltah chashmah jethalal owns crores of property once used to play only 50 rupees to play a character | 'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश

'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश

googlenewsNext

 छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशीसाठी करिअरचे सुरुवातीचे दिवस संस्मरणीय आहेत. आज जेठालाल हे नाव घराघरात पोहोचले आहे त्याची वेगळी ओळख करुन देण्याची काही गरज नाही. वयाच्या 12 व्या वर्षी दिलीप जोशीने अभिनय करण्यास सुरुवात केली.

कधीकाळी या अभिनेत्याला एका भागासाठी फक्त ५० रू. मिळायचे. . आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे दिलीप जोशी यांनी करिअरच्या सुरुवातीस प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना केला होता.मात्र तरीही हार मानली नाही. आपले काम सुरू ठेवले. आज दिलिप जोशी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीत गणले जातात.

म्हणूनच तारक मेहता मालिकेसाठी दिलीप जोशीला सर्वाधिक रक्कम मानधन म्हणून मिळते. मालिकेच्या एका एपिसोडसाठी 1. 5 लाख रू. इतके मानधन दिलीप जोशी यांना मिळते. दिलीप जोशी म्हणजेच सगळ्यांचे लाडके जेठालाल महिन्यात सुमारे 25 दिवस शूट करतात. अशा प्रकारे त्यांचा एक महिन्याचा पगार 36 लाखाहून अधिक आहे.

दिलीप जोशी मुळचे गुजरातचे आहेत. 1997 मध्ये त्यांनी 'कर बात है' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 1989 मध्ये 'मैंने प्यार किया' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

यानंतर दिलीपने बॉलिवूडच्या 'हम आपके है कौन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'हमराज', 'दिल है तुम्हारा' या सुमारे 15 चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांमध्ये फारसे यशस्वी न झाल्यामुळे पुन्हा टीव्हीकडे वळावे लागले आणि तारक मेहता का उल्टा चष्मा माालिकेनेच पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah jethalal owns crores of property once used to play only 50 rupees to play a character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.