Join us

तारक मेहता...च्या मेकर्सनी घेतला मोठा निर्णय, खूशखबरी वाचून नाचू लागतील फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 13:28 IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळत आहे. आता मालिकेच्या मेकर्सनी आपल्या फॅन्सला मोठं सरप्राइज देण्याची घोषणा केली आहे.

टीव्ही दुनियेतील सर्वात कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळत आहे. आता मालिकेच्या मेकर्सनी आपल्या फॅन्सला मोठं सरप्राइज देण्याची घोषणा केली आहे. आता ही मालिका तुम्हाला आधीपेक्षा जास्त हसवणार आहे. 

काय आहे खूशखबर?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका तुम्ही  आधी आठवड्यातून ५ दिवस बघू शकत होते. आता ही मालिका आठवड्यातून ६ दिवस टेलिकास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ही मालिका सोमवार ते शनिवारपर्यंत टेलिकास्ट केली जाईल. सोनी चॅनलवर महासंगम शनिवारच्या अनाउंन्समेंटसोबत मालिका आठवड्यातून सहा दिवस दाखवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान तारक मेहता मालिकेने आतापर्यंत ३२०० एपिसोड पूर्ण केले आहेत. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून सतत लोकांचं भरभरून मनोरंजन करत आहे आणि लोकांना पोट धरून हसवत आहे. या मालिकेत गोकुळधाम सोसायटीतील परिवारांच्या कथा दाखवल्या जातात. जिथे वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. 

या मालिकेतील मुख्य भूमिकांमध्ये जेठालालची भूमिता दिलीप जोशी, तारक मेहताची भूमिका शैलेश लोढा, बबीताजी ची भूमिका मुनमुन दत्ता इत्यादी कलाकार साकारतात. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजन