Join us

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला टप्पूने केला रामराम! राज म्हणाला-योग्य वेळ आली की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 17:22 IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील टप्पू गायब आहे. याबाबत स्वत: आता राजानेच खुलासा केला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण सध्या मात्र चर्चा आहे ती या मालिकेतील कलाकारांची. होय, मालिकेतून दयाबेन दीर्घकाळापासून गायब आहेच. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी हा शो सोडला आहे. आता टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकट (Raj Anadkat ) यानेही मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. याबद्दल निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान जेव्हा राज अनडकटला विचारण्यात आले की तो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडली आहेस का? राज म्हणला जेव्हाही मी काही निर्णय घेईन तेव्हा चाहत्यांना नक्कीच त्याबद्दल सांगेन. राज म्हणाला, 'माझे चाहते, माझे प्रेक्षक, सगळ्यांना माहित आहे की मी सस्पेन्स निर्माण करण्यात हुशार आहे.  जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सगळ्यांना याबाबत कळेल. याआधी मंदार चांदवडकर उर्फ ​​भिडे यांनी टप्पूने शो सोडल्याचेही सांगितले होते. 

गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील टप्पू गायब आहे. टप्पू हा मुंबईच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी गेला आहे, असं या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे टप्पू ही भूमिका साकारणाऱ्या राजनं ही मालिका सोडली आहे, असं म्हटलं जात आहे. टप्पूची भूमिका साकारणारा राज 2017पासून मालिकेत काम करतोय. या आधी अभिनेता भव्य गांधी या मालिकेत टप्पू साकारत होता.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार