फिट राहण्यासाठी 'गुलाम' मालिकेतील नीती टेलर शिकली झुंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2017 11:32 AM
इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार फिटनेस फ्रिक आहेत.आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्यूअलमधून वेळ वेळ काढत व्यायाम करण्यावर लक्षकेंद्रित करतात.लाईफ ओकेवरील गुलाम मालिकेत ...
इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार फिटनेस फ्रिक आहेत.आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्यूअलमधून वेळ वेळ काढत व्यायाम करण्यावर लक्षकेंद्रित करतात.लाईफ ओकेवरील गुलाम मालिकेत शिवानीची भूमिका साकारणारी नीती टेलर फिट राहण्यासाठी झुंबाकडे वळली आहे.तिचा वेट ट्रेनिंग आणि कार्डीओ व्यायामध्ये फारसा विश्वास नसून ती झुंबा डान्स कम फिटनेस वर्कआऊट करते.नीती टेलरला डान्सचीही खूप आवड आहे. गेल्या काही वर्षापासून निती टेलर डान्सचे धडे घेत असून फिट राहण्यासाठीही तिने डान्सचा समावेश असणा-या झुंबा हा व्यायामप्रकार सुरु केला आहे.झुंबामुळे तिला फिट राहायलाच नाहीतर तिचा आत्मविश्वासही वाढण्यासाठी मदत झाली आहे.ती म्हणते, झुंबा हा माझ्यासाठी वर्कआऊट करण्याचा मस्त प्रकार आहे.मला डान्स करायला खूप आवडतं.त्यामुळे झुंबा हा पूर्णपणे अगदी माझ्यासाठीच आहे.जिममध्ये तासनतास वर्कआऊट करण्यापेक्षा मला झुंबा करणे खूप आवडते.रोज मला झुंबा क्लासची वेळ कधी होईल याची मी आतुरतेने वाट पाहात असते.त्यासाठी मी रोज माझ्या शूटिंगच्यावेळेमधून 1 तास मी मस्त झुंबा एन्जॉय करते.त्यामुळे मला फिट आणि अॅक्टीव्ह राहायला मदत होते.झुंबामध्ये संगीत आणि डान्सचा समावेश असल्यामुळे कॅलरीज बर्न होण्यासाठी झुंबा हे एक उत्तम माध्यम आहे असेही ती म्हणाली.सध्या नीतीला एक बेस्ट फ्रेडही भेटली आहे. त्यामुळे ती खूप खुशही असते. सारिका धिल्लन अशा नीतीच्या बेस्ट फ्रेंडचे नाव आहे. सारिकाही नीतीची सहकलाकार आहे. या दोन्ही अभिनेत्री शूटिंगदरम्यान एकत्र तर असतात.मात्र शूटिंग संपल्यानंतरही या एकत्र वेळ घालवत असतात.या दोघींच्या मैत्रीचे सेटवरही इतर कलाकार खूप कौतुक करतात.याविषयी नीती सांगते,सेटवर सर्वांशीच माझे छान जमते पण सारिकाची बातच न्यारी आहे.जसा वेळ मिळेन तसा पॅकअपनंतर,सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र ड्राईव्हला जातो,सिनेमाला जातो आणि खूप सारी मज्जा करतो.तर सारिका नीतीविषयी सांगते,नीतीला मजा करायला आवडते.प्रेमाने मी तिला 'लड्डु' म्हणते.