Join us

तारा आणि निशाने पटकावले 'हाय फिवर'चे विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 10:06 AM

हाय फिवर... डान्‍स का नया तेवर' चे विजेतेपद दिल्‍लीच्या तारा प्रसाद आणि सिक्किमची निशा रसैली या लोकप्रिय डान्सिंग जोडीने पटकावले आहे.

ठळक मुद्देतारा बॅलेट व साल्‍सा नृत्‍यांमध्‍ये पारंगत आहे तारा प्रसाद आणि सिक्किमची निशा रसैलीच्या जोडीला १० लाखांचा धनादेश देण्‍यात आला.

&TV वरील लोकप्रिय डान्‍स रिअॅलिटी शो 'हाय फिवर... डान्‍स का नया तेवर' चे विजेतेपद दिल्‍लीच्या तारा प्रसाद आणि सिक्किमची निशा रसैली या लोकप्रिय डान्सिंग जोडीने पटकावले आहे.  त्‍यांनी आपल्‍या परफॉर्मेन्सने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. या दोघांना १० लाखांचा धनादेश देण्‍यात आला. देशाच्‍या कानाकोप-यातून अत्यंत प्रतिभावंत आणि सर्वोत्‍तम जोड्या या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आल्या. 

स्‍पर्धेचा खडतर प्रवास पार करत ग्रॅण्‍ड फिनालेपर्यंत तारा व निशा, फैजन व लिखित, तेजस व अंशुल आणि आकाश व सूरज या जोड्या पोहोचल्या होत्या.  तारा व निशा ही स्‍पर्धेची विजेती जोडी ठरली, तर फैजन व लिखित ही पहिली उपविजेती जोडी आणि तेजस व अंशुल ही दुसरी उपविजेती जोडी ठरली. त्‍यांना ट्रॉफीसह  ५ लाख आणि ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्‍यात आले. दर आठवड्याला सर्वाधिक गोल्‍डन हॅमर मिळालेले आणि आपले सर्वोत्‍तम नृत्‍यकौशल्‍य सादर केलेले आकाश-सूरज या जोडीला २ लाख रुपयांचे खास बक्षीस देण्‍यात आले.

तारा व निशा हे सातत्‍याने शोचे टॉप परफॉर्मर्स राहिले. त्यांच्यातील केमिस्‍ट्री प्रत्येक वेळी दिसून आली. तारा बॅलेट व साल्‍सा नृत्‍यांमध्‍ये पारंगत होता, तर निशा भारतीय शास्‍त्रीय व बॉलिवूड नृत्‍यामध्‍ये पारंगत होती. या दोघांमधील नृत्‍यकौशल्यांनी त्‍यांना 'हाय फिवर' ट्रॉफीच्‍या अधिक जवळ आणले. दिल्‍लीच्‍या ताराकडे नृत्‍याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्‍याने साल्‍सा, बचॅता, बॅलेट, हिप-हॉप व कन्‍टेम्‍पररी असे विविध नृत्‍यप्रकार अवगत केले आहेत आणि तो हे नृत्‍यप्रकार शिकवतो देखील. त्‍याने बालपणापासूनच नृत्‍य शिकायला सुरुवात केली आणि वर्षानुवर्षे एकाग्रतेने नृत्‍यकौशल्‍य आत्‍मसात करण्‍यावर भर दिला. त्‍याच्‍यामधील नैसर्गिक आकर्षकता, लवचिकता व नृत्‍य करण्‍याची आगळीवेगळी पद्धत यांमुळे तो इतरांपेक्षा उजवा ठरतो. 'हाय फिवर'चा किताब जिंकण्‍याबाबत बोलताना तारा प्रसाद म्‍हणाला, 'मी माझे अर्ध्‍याहून अधिक जीवन नृत्‍याला समर्पित केले आहे. निशासोबत किताब जिंकल्‍यानंतर मिळालेले प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आहे. 'हाय फिवर' हा आमच्‍या करिअरमधील सर्वात मोठा टप्‍पा आहे. मी आशा करतो की आम्‍ही येथून फक्‍त प्रगतीच्‍या दिशेनेच वाटचाल करू.''

टॅग्स :नृत्य