‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये भिडेची भूमिका करणारा अभिनेता मंदार चांदवडकर यांनी त्याचा सहकलाकार गुरुचरण सिंग यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली. 'तारक मेहता..' मधील सोढी अर्थात गुरुचरण सिंग पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरण यांनी 22 एप्रिल रोजी मुंबईला जाण्यासाठी दिल्लीतील त्यांचे घर सोडले होते. परंतु गुरुचरण मुंबईत आले नाहीत. किंवा घरीही परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करण्यास सांगितले.
याविषयी 'तारक मेहता..' मधील आत्माराम भिडेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भिडे अर्थात अभिनेते मंदार चांदवडकर म्हणतात, "हे माझ्यासाठीही खरोखर आश्चर्यकारक आहे. गुरुचरण अनेकदा दिल्ली ते मुंबई दरम्यान प्रवास करायचा. डिसेंबरमध्ये दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात आम्ही शेवटचे भेटलो होतो. आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला, पण तेव्हापासून आम्ही संपर्कात नाही. मी फक्त आशा आणि प्रार्थना करतो की तो ठीक असेल,” मंदार म्हणाला.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण 24 एप्रिलपर्यंत दिल्लीमध्ये होता. यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. 24 तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी उपस्थित होता. तपासादरम्यान गुरुचरणचे लवकरच लग्न होणार असल्याचेही समोर आले. याच दरम्यान, तो आर्थिक संकटाशीही झुंजत होता. या सर्व गोष्टींमध्ये गुरुचरण अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.