Join us

अवघे चार हजार रुपये कमवणाऱ्या बाघाची आज आहे इतकी कमाई, एका दिवसासाठी मिळते इतके मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 5:37 PM

तन्मयला एकेकाळी केवळ चार हजार रुपये पगार होता. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले.

ठळक मुद्देतन्मय अभिनयक्षेत्रात येण्याआधी एका बँकेत कामाला होता. त्याने काही महिने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. त्याला त्यावेळी चार हजार रुपये इतका पगार होता.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची देखभाल नट्टू काका आणि बाघा अनेक वर्षांपासून करत आहेत. हे दोघे या दुकानाचे आधारस्तंभ आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. नट्टू काका तर हे दुकान सुरू झाल्यापासूनच या दुकानात काम करत आहेत तर बाघा देखील गेल्या अनेक वर्षांपासून या दुकानात काम करतोय. जेठालाल या दोघांनाही कधीही नोकर न मानता त्याच्या घरातले सदस्यच मानतो. जेठालालच्या घरातील प्रत्येक कार्यक्रमात बाघा आणि नट्टू काका नेहमीच असतात. नट्टू काका आणि बाघा यांचे जेठालाल सोबतचे नाते खूपच चांगले आहे.

या मालिकेत आपल्याला बाघाच्या भूमिकेत तन्मय वेकारियाला पाहायला मिळत आहे. तन्मयला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून आता लोक त्याला बाघा याच नावाने ओळखायला लागले आहेत. तन्मयला एकेकाळी केवळ चार हजार रुपये पगार होता. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. तन्मयचे वडील अरविंद वेकारिया हे अभिनेते आहेत. त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्याने देखील अभिनयक्षेत्रात येण्याचे ठरवले. त्याने काही गुजराती नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम मिळाले. या मालिकेत तो सुरुवातीला अतिशय छोट्या छोट्या भूमिकेत दिसला होता. पण काही काळानंतर त्याला या मालिकेत बाघा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. 

तन्मय अभिनयक्षेत्रात येण्याआधी एका बँकेत कामाला होता. त्याने काही महिने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. त्याला त्यावेळी चार हजार रुपये इतका पगार होता. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. आता तो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी एका दिवसाचे २२ हजार रुपये घेतो असे म्हटले जाते.   

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा