तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेला मंदार चांदवडकर आणि मयुर वाकानी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता या टीममधील चार जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील काही तंत्रज्ञ तर काही कलाकार आहेत.
नव्या नियमांप्रमाणे नुकत्याच या मालिकेच्या सेटवरील ११० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. ज्यापैकी चार जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, असित कुमार यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, या चार जणांपैकी काही कलाकार आहेत तर काही तंत्रज्ञ आहेत. पण इतर सर्वांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आम्ही एरवी चित्रीकऱणादरम्यान सर्व काळजी घेत असतो. जर कोणी थोडं जरी आजारी असेल तर त्या व्यक्तीला आम्ही चित्रीकरणासाठी बोलावत नाही. या मालिकेत गोलीच्या भूमिकेत असलेल्या कुश शहाला कोरोनाची लागण झाली आहे तर इतर तीन जण तत्रंज्ञ आहेत. हे सगळेच सध्या होम क्वारंटाईन आहेत.
या मालिकेच्या पुढील चित्रीकरणाविषयी असित कुमार सांगतात, चित्रीकरण अचानक बंद होईल याची कल्पना आम्हाला नव्हती. पण सरकारला परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असेल. सध्या तरी बाहेर जाऊन चित्रीकरण करण्याविषयी आम्ही काही विचार केलेला नाही. पण बायो बबलच्या सहाय्याने आम्ही चित्रीकरण करण्याचा विचार करत आहोत.