Join us

तारक मेहतामधील बाघा एकेकाळी कमवायचा चार हजार रुपये, 15 वर्षांच्या मेहनतीनंतर मिळाली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 3:39 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

ठळक मुद्देतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुरुवातीला तन्मयने खूप छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. इन्सपेक्टर, शिक्षक, टॅक्सी ड्राईव्हर, ऑटो ड्राईव्हर अशा विविध भूमिकांमध्ये आपल्याला तन्मयला पाहायला मिळाले होते.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बाघाची भूमिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेत बाघाच्या भूमिकेत आपल्याला तन्मय वेकारियाला पाहायला मिळत आहे. बाघा एकेकाळी केवळ चार हजार रुपये कमवायचा. पण आता त्याची कमाई लाखोंमध्ये आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुरुवातीला तन्मयने खूप छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. इन्सपेक्टर, शिक्षक, टॅक्सी ड्राईव्हर, ऑटो ड्राईव्हर अशा विविध भूमिकांमध्ये आपल्याला तन्मयला पाहायला मिळाले होते. तन्मयला बाघा या भूमिकने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आज लोक त्याला बाघा या नावानेच ओळखतात. 

तन्मय गेल्या अनेक 15 वर्षांपासून अभिनयक्षेत्रात आहे. त्याने रंगभूमीवरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तन्मयच्या वडिलांचे नाव अरविंद वेकारिया असून त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. तन्मयचे वडील प्रसिद्ध अभिनेते असले तरी त्याला खूपच संघर्ष करावा लागला.

तन्मय काही वर्षांपूर्वी बँकेत मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करायचा. त्याला तिथे चार हजार रुपये पगार होता. पण आज बाघाची कमाई लाखोंच्या घरात आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, बाघा, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा