Join us

भिडे मास्तरची बायकोदेखील आहे अभिनेत्री, सध्या या मराठी मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:32 IST

Mandar Chandwadkar: मंदार चांदवडकरने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली होती. पण त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. पण फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे.

'तारक मेहता का उलटा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही हिंदी मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील आत्माराम भिडे या पात्राला रसिकांचे खूप प्रेम मिळाले. ही भूमिका अभिनेता मंदार चांदवडकर(Mandar Chandwadkar)ने साकारलेली आहे. मंदार चांदवडकरने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली होती. पण त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. पण फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील एका मालिकेत काम करताना दिसत आहे.

मंदार चांदवडकर यांच्या पत्नीचे नाव स्नेहल चांदवडकर आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थनकर, विजय आंदळकर, विवेक सांगळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत स्नेहल चांदवडकर आत्याच्या म्हणजेच मंजूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही भूमिका थोडीशी विरोधी असल्याचे ती सांगते. 

स्नेहल चांदवडकरने लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेतून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. तिने १०.२९ की आखरी दस्तक या हिंदी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. 

टॅग्स :मंदार चांदवडकरतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा