Join us

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेनं रचला नवीन रेकॉर्ड, मालिकेच्या टीमने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 4:57 PM

Tarak Mehta Ka Ulta Chashma दिवसेंदिवस हटके कथानक सादर करत रसिकांची भरघोस मनोरंजन करणारी ही मालिका बच्चेकंपनीपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचीच फेव्हरेट मालिका बनली आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मात्र या मालिकांपैकी अगदी मोजक्या मालिका वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घालतात. अशीच एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'.

या मालिकेनं गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. नुकतंच या मालिकेनं ३३०० भागपूर्ण केले आहेत. केवळ मोठा पल्लाच गाठला नाही तर या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.  मालिकेची टीमसुद्धा भलतीच खुश आहे.

मालिकेनं अनेक चढउउतार पाहिले असले तरी रसिकांना जे आवडतं ते दाखवून त्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरल्याबद्दल निर्माते असित मोदी यांनीही आनंद व्यक्त केला आहे.सोशल मीडियावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत रसिकांचे आभार मानले आहेत. मालिकेत दया बेन दिसत नसल्यामुळे रसिक तिला पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. 

दया बेनने मालिकेतून एक्झिट घेतली असली तरी मालिकेच्या टीआरपीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेकडून इतर मालिकांनाही जोरदार  टक्कर मिळत आहे. नवीन मालिका असूनही या मालिकेपुढे हिट ठरण्यात अजून तरी कोणत्या मालिकेला यश मिळालेले नाही. दिवसेंदिवस हटके कथानक सादर करत रसिकांची भरघोस मनोरंजन करणारी ही मालिका बच्चेकंपनीपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचीच फेव्हरेट मालिका बनली आहे. त्यामुळे आगामी काळातही मालिका नवनवीन रेकॉर्ड रचणार असंच दिसत आहे.   

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा