Join us

​तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया आणि जेठा बनले सांताक्लॉज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 5:19 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच सगळे सण उत्सवात साजरे केले जातात. गोकुळधाम सोसायटीत सगळ्याच जाती-धर्माचे लोक ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच सगळे सण उत्सवात साजरे केले जातात. गोकुळधाम सोसायटीत सगळ्याच जाती-धर्माचे लोक राहातात. त्यामुळे येथे प्रत्येक धर्माचे सण साजरे केले गेल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळते. एखादा सण साजरा केला नाही तरी त्या सणाच्या शुभेच्छा तरी मालिकेच्या शेवटी या मालिकेचे सूत्रधार तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा प्रेक्षकांना देतो. काहीच दिवसांत ख्रिसमस सुरू होणार आहे. सध्या सगळीकडेच ख्रिसमसची तयारी सुरू आहे. त्यात छोटा पडदाही कसा मागे राहाणार? तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतदेखील ख्रिसमस मूड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.तारक मेहताच्या फॅन्सना या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी शैलेश लोढा तर असणार आहे. पण त्याचसोबत त्याला त्याच्या आणखी दोन सहकलाकारांची साथ मिळणार आहे. या मालिकेतील दोन कलाकार सांताक्लॉजच्या वेशात प्रेक्षकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणार आहेत. हे पाहून प्रेक्षक खूश होतील यात काहीच शंका नाही.  सांताक्लॉजचे रूप या मालिकेत दयाची भूमिका साकारणारी दिशा वाखानी आणि जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी घेणार आहे. सांताक्लॉजचे गेटअप करण्यासाठी ते दोघेही खूपच खूश होते. दिलीप जोशीने सांगितले, "मी शाळेत असताना हा सण आनंदाने साजरा करत असे. आता स्वतःलाच सांताक्लॉज बनायला मिळत असल्याचा आनंद काही वेगळाच आहे. सांताक्लॉजने सगळ्यांना खूप सारे आनंदाचे क्षण द्यावेत असेच मी यावेळी म्हणेन." तर दिशा सांगते, "ख्रिसमसमध्ये सांताक्लॉज सगळ्यांना जे गिफ्ट देतो, ते मला खूप आवडते. हा सण मी नेहमीच एन्जॉय करते."