कलर्सचे ऐतिहासिक नाट्य दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली मध्ये मुगल कालखंडाची जादु जिवंत करण्यात आली आहे. त्यात अनभिषिक्त राजकुमार सलीम (शाहीर शेख) एका अतिशय सुंदर कनीज अनारकलीच्या (सोनारिका भदोरिया) प्रेमात पडतो याची चिरंतन कथा दाखवण्यात आली आहे. इतिहासातील सर्वात जास्त स्मरणीय असलेल्या या प्रेमकथे मध्ये नामवंत कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये सादर केले आहेत. शाहबाज खान मुगल सम्राट अकबराची भूमिका साकारणार आहेत, तर गुरदिप पंज कोहली त्याची लाडकी बायको जोधाची भूमिका साकारणार आहे, तसेच प्रसिध्द तसनीम शेख अकबराच्या पहिल्या बायकोची नकारात्मक रूकैय्याची भूमिका साकारणार आहे.
ही मालिका एक पिरीयड नाट्य असल्यामुळे सर्व कलाकारांना त्यांची पात्रे उत्तमरीत्या साकरणे हे एक आव्हानच आहे. त्यांच्या पैकी अनेकजण खोलवर संशोधन करत आहेत आणि कुशलते साठी आणि उत्कृष्ट सादर करण्यासाठी सूक्ष्मतेचा शोध घेत आहेत. तिच्या तयारी विषयी बोलताना, तसनीम शेख म्हणाली, “प्रत्येक प्रेमकथा महान प्रेमकथा तेव्हाच बनते जेव्हा त्यात एक जबरदस्त व्हिलन असतो आणि त्याच्यावर त्यांना मात करावी लागते. या प्रेमकथेत माझे पात्र रूकैय्या हा सर्वात मोठा अडथळा आहे आणि असे लक्षवेधक पात्र साकारण्याची संधी मला मिळाली यासाठी मी उत्तेजित झाले आहे. याच्या तयारीसाठी मी गेम ऑफ थ्रोन्स च्या लोकप्रिय पिरीयड मालिका पहायला सुरूवात केली मला असे वाटते की ऐतिहासिक ड्रामाचे काम कसे असते हे पाहण्याचा हा चांगला मार्ग आहे. मी 7 दिवसात मालिकेचे 7 सीझन पाहिले आणि मला सरसी लॅनिस्टरच्या पात्राकडून खूप छान प्रेरणा मिळाली. रूकैय्या साकारताना तिच्या अधिकाराच्या आणि आक्रमकतेच्या पातळीपर्यंत मी पोहोचेन अशी मला आशा आहे.”