Join us

"कधी कधी बाहेर पडावं लागतं कारण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:05 IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आता तेजश्रीने पोस्ट शेअर केली आहे.

तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. सध्या तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण, तेजश्रीने या मालिकेतून आता एक्झिट घेतली आहे. आता तेजश्री मुक्ताची भूमिका साकारताना दिसणार नाही. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आता तेजश्रीने पोस्ट शेअर केली आहे. 

तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने "कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा, कारण तुमच्यासाठी हे दुसरं कोणीही करणार नाही", असं म्हटलं आहे. तेजश्रीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'प्रेमाची गोष्ट' या स्टार प्रवाह वाहिनीवरील  मालिकेतील मुक्ता-सागर यांची जोडी प्रेक्षकांना भावली. मालिकेत अभिनेता राज हंचनाळे हा सागर कोळीच्या भूमिकेत आहे. तर मुक्ताची भूमिका तेजश्री साकारत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका दिसते.  पण, तेजश्रीने आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिलेली आहे. पण, यामागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

या मालिकेत आता मुक्ताच्या भूमिकेत नवी अभिनेत्री दिसणार आहे. अभिनेत्री स्वरदा ठिगळे 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एन्ट्री घेणार आहे. या मालिकेत ती आता मुक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, तेजश्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तिचा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

टॅग्स :तेजश्री प्रधान टिव्ही कलाकारस्टार प्रवाह