Join us

"सीनिअर कलाकारांच्या तुलनेत मला...", तेजस्वी प्रकाशने केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:58 IST

तेजस्वी प्रकाश नेमकं काय म्हणाली?

'बिग बॉस १५' ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) नेहमीच चर्चेत असते. सध्या ती 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये दिसत आहे. याशिवाय तेजस्वीने काही रिएलिटी शोज केले आहेत. मराठी सिनेमांमध्येही ती दिसली आहे. तेजस्वी मराठमोळ्या कुटुंबातून येते. नुकतंच तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीचा संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. सीनिअर कलाकारांना सर्व सोयी सुविधा मिळतात आणि आपल्याला कशी वेगळी वागणूक दिली जायची याचा तिने खुलासा केला.

'झूम'शी बोलताना तेजस्वी प्रकाश म्हणाली, "सुरुवातीला जेव्हा मी सीनिअर कलाकारांसोबत काम करायचे तेव्हा साहजिकच त्यांची जास्त लोकप्रियता होती. मला फार वेगळी वागणूक मिळायची. त्यांना राहण्यासाठी चांगल्या खोल्या, चांगली व्हॅनिटी व्हॅन आणि चविष्ट जेवणही मिळायचं. मला सुरुवातीला या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं."

ती पुढे म्हणाली, "काही काळ इंडस्ट्रीत घालवल्यानंतर मी माझी किंमत ओळखली. मी स्वत:सोबत चुकीचा व्यवहार होऊ दिला नाही. जेव्हा मला जाणवलं की मला कमी मानधन मिळत आहे मी त्यानंतर जास्त पैसे मागायला लागले. लोकांना मला पाहायचं आहे तर मग मी कमी पैशात काम का करु?"

तेजस्वी प्रकाशने २०१५ साली 2612 या टीव्ही शोपासून करिअरला सुरुवात केली. नंतर ती 'संस्कार-धरोहर अपनो की', 'स्वरागिनी -जोडे रिश्तो के सुर','पहरेदार पिया की','कर्ण संगिनी','खतरो के खिलाडी १०' या शोंमध्ये दिसली. बिग बॉस १५ ची विजेती झाल्यानंतर तर तिची लोकप्रियचा कमालीची वाढली. 

टॅग्स :तेजस्वी प्रकाशमराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजन