Join us

‘Naagin 6’ चं बजेट वाचून व्हाल अवाक्, इतक्या पैशात तर दोन तीन सिनेमे बनले असते!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:03 IST

Naagin 6: होय, ‘नागीन 6’ हा मालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सीझन असणार आहे. एकता कपूरने यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.

 ‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी जिंकल्या जिंकल्या तेजस्वी प्रकाशच्या (Tejasswi Prakash) हाती ‘नागीन 6’ ( Naagin 6) सारखा मोठा शो लागला आणि आता तेजस्वी या मालिकेच्या शूटींगसाठी एकदम सज्ज आहे. ‘बिग बॉस 15’ शो संपल्यानंतर आराम करण्यासाठी तेजस्वीला फक्त 1 दिवस मिळाला. दुसऱ्याच दिवसांपासून ती कामाला लागली. काही आऊटफिट्सची ट्रायल, प्रोमो शूट असं सगळं सुरू झालंय.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘नागीन 6’ हा मालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सीझन असणार आहे. एकता कपूरने (Ekta Kapoor) यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.

होय, सूत्रांचे मानाल तर या मालिकेचा बजेट 130 कोटींचा आहे. होय, इतक्या पैशात दोन तीन लहान सिनेमे बनतील, तितका पैसा या मालिकेवर खर्च होणार आहे. साहजिकच हा सीझन हिट करण्याचं प्रेशर सगळ्यांवरच असणार आहे. हा शो लोकप्रिय झाला नाही तर कदाचित एकता कपूर ‘नागीन’ फ्रेंचाइजी बंद करू शकते, अशीही चर्चा आहे. साहजिकच  तेजस्वीवर मोठा दबाव असणार आहे. ‘नागीन 6’मध्ये अनेक स्पेशल इफेक्ट्स भरणार असणार आहे. यावरही बराच पैसा खर्च होणार आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर येत्या 12 तारखेपासून हा शो सुरू होणार आहे. पहिल्या स्पेशल एपिसोडमध्ये आत्तापर्यंतच्या सर्व ‘नागीन’ थिरकताना दिसणार आहेत. यात अनीता हसनंदानी, अदा खान, सुरभी चंदना स्पेशल परफॉर्मन्स देताना दिसतील. यानंतर तेजस्वीची ग्रँड एन्ट्री होईल. 

शोचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे आणि यात तेजस्वीची झलक पाहून फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तेजस्वीवर एकता कपूरने मोठा डाव लावला आहे. आता तेजस्वी यात किती यशस्वी होते, ‘नागीन 6’ हा शो किती हिट होतो, ते बघूच.

टॅग्स :तेजस्वी प्रकाशएकता कपूरनागिन 3