Join us

"एका एपिसोडसाठी गटारातील घाणीत उतरून शूट केलं अन्..." दयाने सांगितला 'CID' चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 12:00 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सीआयडी' लवकरच सुरू होणार आहे.

CID : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सीआयडी (CID) लवकरच सुरू होणार आहे. तब्बल २० वर्ष अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सीआयडी मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. जवळपास ६ वर्षानंतर ही मालिका पु्न्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एसीपी प्रद्युमन, दया तसेच अभिजीत पुन्हा गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी येत आहेत. अशातच मालिकेच्या शूटिंगदरम्यानेचे किस्से दयानंद शेट्टी म्हणजेच दयाने शेअर केले आहेत. 

'AP Podcast' या युट्यूब चॅनेलसोबत खास बातचीत करताना दयाने या मालिकेतील आठवणी ताज्या केल्या. त्यादरम्यान दयानंद शेट्टीने सांगितलं, "मालिकेच्या सेटवर प्रत्येकजण एकमेकांसोबत आदराने वागायचा. खरंतर प्रत्येकाची वॅनिटी व्हॅन वेगळी असायची, परंतु मेकअप रुम एकच होती". 

पुढे अभिनेता म्हणाला, " सेटवर कोणासोबतही भेदभाव केला जात नसे. हा छोटा तो मोठा अ‍ॅक्टर असंही काही नव्हतं. सगळे मनमोकळेपणाने वागायचे. खरं सांगायचं झालं तर तिथलं वातावरण मिलिट्रीप्रमाणे असायचं. प्रत्येकजण आपलं काम प्रामाणिकपणे करायचा. आम्हाला सीनसाठी गटारात, घाण पाण्यात उतरावं लागत असे. पण, तरीही कोणी डायरेक्टरला तक्रार केली नाही. अशा ठिकाणी आम्ही काम करणार नाही असं आम्ही त्यांना कधी म्हणालो नाही. तिथे मिलिट्री लेव्हलवर शूटिंग व्हायची. सीआयडी करताना एक वेगळी गोष्ट होती ती म्हणजे शूटिंगचं लोकेशन आणि सहकलाकार बदलत राहायचे. एका एपिसोडसाठी  १५ ते २० ठिकाणी जावं लागत असे. त्यामुळे कधी कंटाळा आला नाही. असा खुलासा अभिनेत्याने केला".

टॅग्स :सीआयडीशिवाजी साटमटिव्ही कलाकार