राम कपूरने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. काही वर्षांपूर्वी कसम से या मालिकेत तो प्राची देसाईसोबत झळकला होता. त्यानंतर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याच्या करियरला एक वेगळीच दिशा दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तुम्हाला माहीत आहे काय की, घर एक मंदिर या मालिकेत रामच्या भावजयीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबरोबरच त्याने खऱ्या आयुष्यात लग्न केले आहे. घर एक मंदिर या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच राम आणि त्याच्या भावजयीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी गाडगीळ यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि दोघांची ही लव्हस्टोरी पुढे लग्नाच्या वळणावरच येऊन थांबली.
खरं तर नेहमीच मालिकेत एका परफेक्ट पतीची भूमिका साकारणारा राम कपूर रिअल लाइफमध्येदेखील परफेक्ट पती आहे. तो पत्नी गौतमीवर प्रचंड प्रेम करतो. गौतमीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. घर एक मंदिर मालिकेदरम्यानच दोघांची भेट झाली होती. पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची भेट २००० ते २००२ दरम्यान प्रसारित करण्यात आलेल्या ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली. दोघे या मालिकेत काम करत होते. गौतमी रामच्या भावजयीची भूमिका साकारत होती. पुढे राम कपूरला मालिकेतील त्याच्या भावजयीवर प्रेम जडले. परंतु हे प्रकरण इथेच थांबले नव्हतो. कारण या दोघांच्या प्रेमात अडथळे येण्यास सुरुवात झाली.
जेव्हा रामने गौतमीला प्रपोज केले होते, तेव्हा तिने त्याला लगेचच होकार दिला होता. परंतु रामची ही लव्हस्टोरी त्याच्या घरच्यांना अजिबातच पसंत नव्हती. त्यामुळे गौतमीबरोबर लग्न करण्यासाठी रामला घरच्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यामागचे कारण म्हणजे गौतमीचे हे दुसरे लग्न होते. तसेच गौतमीलादेखील रामने पार्टीत जाणे, ड्रिंक करणे त्यांना पसंत नव्हते. या सर्व अडथळ्यांनंतर मालिकेतील हे दीर-भावजयी १४ फेब्रुवारी २००३ रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विवाहबंधनात अडकले. या दाम्पत्याला दोन मुले असून मुलगी सियाचा जन्म १२ जून २००६ ला झाला तर मुलगा अक्सचा जन्म १२ जानेवारी २००९ ला झाला.