Gauahar Khan: गौहर खान (Gauahar Khan) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'बिग बॉस-७' ची ती विजेती देखील ठरली आहे. दरम्यान, गौहर ली तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. सध्या सोशल मीडियावर राशा थडानीचं गाणं 'उई अम्मा' खूप व्हायरल होत आहे. अशातच या गौहर खानने या गाण्यावर जबरदस्त डान्स करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गौहर खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही ना काही पोस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करत असते. सध्या तिने डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गौहरने या व्हिडीओमध्ये उत्तम डान्स करत आपल्या अदाकारिने अनेकांना भूरळ पाडली आहे. त्याचबरोबर तिचे हावभाव सुध्दा लक्ष वेधत आहेत. अभिनेत्रीचं हे नृत्य कौशल्य पाहून मलायका अरोरा, श्री राम राय शिवाय अमित त्रिवेदी या मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट्स करुन तिचं कौतुक केलं आहे. व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाची साडी त्यावर फ्लोरल प्रिंट ब्लाउज परिधान करुन या लूकमध्ये गौहार दिसते आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री गौहर खानने 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'गेम', 'इश्कजादे','क्या कूल हैं हम-3', 'फीवर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'बेगम जान', 'तेरा इंतजार', 'नाइन आवर्स इन मुंबई' असे चित्रपट केले. शिवाय गौहर खान नेटफ्लिक्सवरील '१४ फेरे की कहानी' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.