Join us

'दीया और बाती फेम' अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर तब्बल ११ वर्षांनी मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 14:42 IST

कनिकाने कॉलेज स्वीट हार्ट अंकुर घईसोबत 2012 मध्ये लग्न केले होते.

'दीया और बाती हम' फेम अभिनेत्री कनिका माहेश्वरीने (Kanika Maheshwari) घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. कनिकाने कॉलेज स्वीट हार्ट अंकुर घईसोबत 2012 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर तब्बल ११ वर्षांनी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कनिका 'दीया और बाती हम' मालिकेत मीनाक्षी भाभीच्या भूमिकेत दिसली होती. 

कनिका आणि अंकुर गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. काही महिन्यातच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कनिका आणि अंकुर ४ वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांचा ८ वर्षीय मुलगा नानक कनिकासोबत मुंबईत राहतो. तर अंकुर दिल्लीत वास्तव्यास आहे. दोघांनी लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले.

कनिका आणि अंकुर दोघांच्यात अनेक मतभेद होत होते. तसंच लाँग डिस्टन्स टिकवणंही कठीण होत होतं. 2013 साली दोघांनी डान्स रिएलिटी शो 'नच बलिये' सिझन 6 मध्ये सहभाग घेतला. याशिवाय दोघांनी मिळून काही शॉर्ट फिल्म्सची निर्मिती केली आहे. तसंच त्यांनी अनेक वेबसिरीजही केल्या आहेत. जेव्हा त्यांना कळलं की आपल्यात काहीच आलबेल होत नाहीए तेव्हा त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

कनिका शेवटची 'दिल दियां गलां' मध्ये दिसली होती. अद्याप कनिकाने या बातमीला दुजोरा दिलेला नाही. तर अंकुरने याचं खंडन केलंय.

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट