Join us

"मराठी सिनेमा बनवणं हे चॅलेंज...", अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचं 'ते' वक्तव्य चर्चेत, प्रेक्षकांना म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:36 IST

'पुढचं पाऊल', 'रंग माझा वेगळा' या मालिकांमधून अभिनेत्री हर्षदा खानविलकर घराघरात पोहोचल्या.

Harshada Khanvilkar: 'पुढचं पाऊल', 'रंग माझा वेगळा' या मालिकांमधून अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) घराघरात पोहोचल्या. छोट्या पडद्यावर त्यांनी सासूबाईची भूमिका अगदी चोखपणे साकारली. सध्या हर्षदा खानविलकर झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेली लक्ष्मी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते आहे. दरम्यान, हर्षदा खानविलकर यांनी अलिकडेच माध्यमांशी संवाद साधताना मराठी चित्रपटांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. 

नुकताच हर्षदा खानविलकर यांनी 'इट्टस मज्जा' सोबत खास संवाद साधला. त्यादरम्यान, हर्षदा खानविलकर म्हणाल्या, "मराठी सिनेमा बनवणं हे अपने आप में एक चॅलेंज आहे. त्यामुळे हे सिनेमे बनणं आणि त्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाणं गरजेचं आहे. मी प्रेक्षकांना हिच विनंती करेन की थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा. सिनेमा चांगला आहे की वाईट हे नंतर ठरवा. पण, सिनेमा जाऊन बघायला पहिजे. मला वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप मेहनत असते."

पुढे त्या वेगवेगळ्या मराठी चित्रपटांची उदाहरणं देत म्हणाल्या, "आपल्याकडे खूप चांगले सिनेमे येत आहेत. मला वाटतं की इतके छान छान सिनेमे येत असतील तर सिनेरसिक नक्कीच थिएटरमध्ये जातील." असं त्या म्हणाल्या. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसिनेमा