अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरु झालेली ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत घोडदौड करताना दिसत आहे. या मालिकेतील परी, नेहा, यश ही कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे. यामध्येच या मालिकेविषयी, त्यातील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. म्हणूनच, सध्या या मालिकेचं चित्रीकरण कुठे सुरु आहे हे नुकतंच समोर आलं आहे.
साधारणपणे मराठी मालिकांचं चित्रीकरण हे गोरेगाव फिल्मसिटीमध्ये होतं. हे साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, या लॉकडाउनच्या काळात अनेक चित्रपट, मालिका यांच्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी आपल्या प्रोजेक्टसाठी बाहेरची शहरं किंवा राज्यांची निवड केली. यात माझी तुझी रेशीमगाठ ही मालिकादेखील अपवाद नाही.
श्रेयस तळपदेची रिअल लाईफ परी कोण माहितीये का? पाहा त्याच्या लेकीचे फोटो
अन्य मालिकांप्रमाणेच 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचं चित्रीकरण गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये न होता. चक्क ठाण्यात सुरु आहे. त्यामुळे या मालिकेच्या शुटींगसाठी सगळ्या कलाकार मंडळींना दररोज ठाण्याला जावं लागतं.
दरम्यान, या मालिकेचं चित्रीकरण नेमकं कुठे सुरु आहे. असा प्रश्न कायमच प्रेक्षकांना पडत असतो. मात्र, आता प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर निक्कीच मिळालं आहे. या मालिकेतील बालकलाकार परी म्हणजेच मायरा वायकुळ ही चिमुकली मुलगी सध्या लोकप्रिय चाइल्ड आर्टिस्ट ठरत असून सोशल मीडियावरही तिचा फॅन फॉलोअर्स वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.