Join us  

टेरेंस लुईसने नोरा फतेहीला चुकून केला होता स्पर्श? कोरिओग्राफरने सांगितले त्या आक्षेपार्ह व्हिडीओमागचे सत्य

By रूपाली मुधोळकर | Published: October 08, 2020 5:09 PM

होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. मग काय नेटक-यांनी टेरेंस लुईसला जबरदस्त ट्रोल केले होते.

ठळक मुद्दे नोरा व टेरेंसच्या या व्हिडीओवर नेटक-यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती टेरेंस, असे एका युजरने लिहिले होते.

बॉलिवूडमध्ये डान्स आणि अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसली होती. यादरम्यानचा एक  व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची पुरती सटकली होती. होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. मग काय नेटक-यांनी टेरेंस लुईसला जबरदस्त ट्रोल केले होते. हे ट्रोलिंग आणि त्या व्हिडीओत आता टेरेंसने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत टेरेंस यावर बोलला. तो म्हणाला, ‘खरे सांगू पहिल्यांदा मी हा व्हायरल व्हिडीओ बघितला तेव्हा जराही विचलित झालो नव्हतो. हा व्हिडीओ एडिटेड होता, हे पाहताक्षणी लक्षात येते होते. त्यात स्पेशल इफेक्ट्स होते, हेही स्पष्टपणे दिसत होते. आजच्या जगात प्रत्येक सेलिब्रिटीवर मीम्स बनतात. हे सगळे खोडसाळ मीमरचे काम होते. मला अशा ट्रोलिंगने जराही फरक पडत नाही. दोन-चार तासांत हा व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाला होता आणि लोक मला नाही नाही ते बोलत होते. पण माझ्याकडे 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत, जे खूप समजदार आहेत. ट्रोलिंगसाठी जी भाषा वापरली गेली, ती खूप अपमानास्पद होती. माझे फॉलोअर्स ट्रोलर्सविरोधात मैदानात उतरल्यावर मी आणि नोरा आम्ही दोघांनी यावर एक सांकेतिक पोस्ट टाकण्याचा निर्णय घेतला.’

टेरेंसने शेअर केली होती पोस्टनोराचा फोटो शेअर करत टेरेंसने ट्रोल करणा-यांना उत्तर दिले होते. या फोटोत टेरेंसने नोराला हातांवर उचलले होते. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने एक कथा लिहिली होती. एकदा एक साधू एका स्त्रीला नदी पार करण्यासाठी मदत करतो. तो साधू त्या स्त्रीला हातावर उचलून नदी पार करवतो.  हे पाहून एक शिष्य साधूला प्रश्न विचारतो. तुमच्यासाठी स्त्रीस्पर्श सुद्धा गैर आहे, असे असताना तुम्ही एका स्त्रीला हातावर चक्क उचलून नदी पार कशी केली? असा प्रश्न शिष्य साधूला करतो. यावर  मी त्या स्त्रीला नदीच्या पलीकडे सोडले सु्ध्द्धा आणि तू अजूनही तिचा भार उचलून आहेस?, असा प्रतिप्रश्न साधू शिष्याला करतो. यावर शिष्य निरूत्तर होतो. ही कथा लिहित टेरेंसने एकप्रकारे उत्तर दिले होते. टेरेंसच्या या पोस्टवर नोरानेही कमेंट केली होती   धन्यवाद टेरेंस,सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोसोबत सर्रास छेडछाड होत असताना तू विचलित झाला नाही, हे बघून आनंद वाटला. हा काळही निघून जाईल. या शोमध्ये तू आणि गीता मांने मला खूप आदर व प्रेम दिले. माझ्यासाठी हा एक मोठा अनुभव आहे, असे नोराने लिहिले होते. काय होते व्हिडीओतसोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ 12 सप्टेंबरला चॅनलवर प्रसारित झालेल्या एपिसोडचा असल्याचा दावा केला गेला होता. यात ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा गेस्ट म्हणून आले होते. शोमध्ये तिन्ही जज गीता कपूर, नोरा व टेरेंस हे शत्रुघ्न व पूनम यांचे अनोखे स्वागत करतात. व्हिडीओत दिसते त्यानुसार, याचदरम्यान टेरेंसने नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करतो. नोरा यावर काहीही रिअ‍ॅक्ट करत नाही.

नेटक-यांनी घेतला टेरेंसचा क्लास नोरा व टेरेंसच्या या व्हिडीओवर नेटक-यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती टेरेंस, असे एका युजरने लिहिले होते. अर्थात काही जणांनी टेरेंसचे समर्थनही केले आहे. कदाचित नोराला खाली वाकण्यासाठी इशारा देताना असे केले असावे, असे काहींनी म्हटले होते. काहींनी मात्र यानिमित्ताने टेरेंसवर सडकून टीका केली आहे. आधी मला वाटले, चुकून टेरेंसचा हात लागला असावा. पण चुकून कोणाला हात लागला तर आपण माफी मागतो. पण असे काहीही झाले नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली होती.  

बाबो..! नोरा फतेहीला कोरिओग्राफर टेरेन्सनं केलं इम्प्रेस, मोरक्कन भाषेत केलं प्रपोज

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी

टॅग्स :नोरा फतेही