Join us

VIDEO : टेरेन्सने खास अंदाजात सर्वांसमोर व्यक्त केलं 'प्रेम', लाजून कावरी बावरी झाली नोरा फतेही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 14:59 IST

नोराला पुन्हा कोरिओग्राफर टेरेन्स लुईस स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने नोराकडे त्याच्या मनातील 'प्रेम' बोलून दाखवलं.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिचं नवं गाणं 'नाच मेरी राणी' मुळे आणि त्यातील डान्समुळे चर्चेत आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आठवड्यात पुन्हा एकदा नोरा इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये आली होती. खास बाब तर ही आहे की, नोराला पुन्हा कोरिओग्राफर टेरेन्स लुईस स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने नोराकडे त्याच्या मनातील प्रेम बोलून दाखवलं. हे पाहून मलायका अरोरा आणि गीता कपूर थक्क झाल्या. नोरा आणि टेरेन्सचा हाच व्हिडीओ व्हायरल झालाय.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, टेरेन्स लुईस आणि नोरा फतेहीला बघून 'पहला पहला प्यार है' हे गाणं गातो. जे ऐकून नोराला आश्चर्याचा धक्का बसतो. टेरेन्सने अशाप्रकारे प्रपोज केल्याने ती लाजली. हे इतक्यावर थांबलं नाही तर टेरेन्सने नोराला उचलून घेतलं. 

हे सगळं स्टेजवर होताना बघून मलायका अरोरा  आणि गीता कपूर थक्क झाल्या. नोरा आणि टेरेन्सचा हा व्हिडीओ 'बॉली गॅंग' इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. याआधी नोरा आणि टेरेन्सच्या एका व्हिडीओवरून चांगलाच गोंधळ उडाला होता. पण हा व्हिडीओ त्यांच्या फॅन्सना आवडला आहे.

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसच्या या व्हिडीओला आतापर्यंत ९ हजारांपेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच दोघांच्या या व्हिडीओवर त्यांचे फॅन्स भरभरून कमेंटही करत आहेत. नोरा ही नुकतीच तिच्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर आली होती. 

टॅग्स :नोरा फतेहीटेलिव्हिजनबॉलिवूड