कोरिओग्राफर टेरेंस लुईस (Terence Lewis) बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सोबत सध्या डान्स रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 2 (India’s Best Dancer Season 2)’ मध्ये जज म्हणून दिसत आहे. शोमध्ये नेहमीच दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी असते. दोघांना एकत्र डान्स करताना बघणंही अनेकांना आवडतं. शोमधील दोघांची बॉंन्डींग बघून फॅन्स नेहमीच त्यांना प्रश्न विचारतात की, दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही आहे का? कारण दोघांच्या अफेअरची चर्चा नेहमीच होत असते.
आता टेरेंस लुईसने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. टेरेंस म्हणाला की, नोरासोबत त्याची केमिस्ट्री कमाल आहे आणि दोघांमध्ये चांगलं बॉन्डींगही आहे. पण त्याने डेटिंगच्या बातम्यांना नाकारलं. टेरेंसनुसार, नोरा फारच रिअल आहे आणि ती तेच बोलते आणि करते जे तिच्या मनात असतं.
सिद्धार्थ कननसोबत बोलताना टेरेंस लुईसने नोरा फतेहीसोबत आपल्या मैत्रीबाबत बोलताना म्हणाला की, दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, जर तो नोरासोबत रिलेशनशिपमध्ये असता तर? यावर टेरेंस म्हणाला की 'ते गुपित आहे ते गुपितच राहू द्या. तो पुढे म्हणाला की, आम्ही चांगले मित्र आहोत. त्याशिवाय आमच्यात काहीच नाही.
टेरेंस पुढे म्हणाला की, 'मला वाटतं की, ऑनस्क्रीन आमची केमिस्ट्री कमाल आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नोरा फारच स्वतंत्र विचारांची आहे. माझी एनर्जी आणि वाइब्सही तसेच आहेत. ती एक डान्सर आहे त्यामुळे तिला समजतं. ती फार मेहनती आहे. कधी कधी ती काही बोलते तेव्हा मी तिला समजावतो की, तू असं करायला नको होतं. पण ती अशीच आहे. 'आता मी बोललो' हाच तिचा चार्म आहे. आम्ही चांगले मित्र आहोत आणि आमचं नातं फार चांगलं आहे'.