Join us

रेमो डिसोझाने एबीसीडीच्या यशासाठी मानले प्रभुदेवाचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2017 11:09 AM

रेमो डिसोझाने आज एक कोरिअग्राफर, दिग्दर्शक म्हणून त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली अनेक वर्षं तो नृत्य दिग्दर्शन ...

रेमो डिसोझाने आज एक कोरिअग्राफर, दिग्दर्शक म्हणून त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली अनेक वर्षं तो नृत्य दिग्दर्शन करत आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटात त्याने केलेल्या नृत्य दिग्दर्शनाचे तर विशेष कौतुक करण्यात आले होते. एबीसीडी या त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. या चित्रपटाची निर्मितीदेखील त्यानेच केली होती. नृत्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला एबीसीडी हा पहिला बॉलिवूडचा चित्रपट होता. त्यात प्रभुदेवा वगळता सगळे नवे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. पण या चित्रपटातील धर्मेश, पुनित, शक्ती या नवीन चेहऱ्यांनी खूपच चांगला अभिनय केला होता. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले असून सध्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. या चित्रपटाचा निर्माता रेमो डिसोझा हा सध्या डान्स प्लस या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये व्यग्र आहे. तसेच रेमाची निर्मिती असलेल्या एका चित्रपटात सलमान खान झळकणार आहे. या सगळ्यामुळे रेमो चांगलाच बिझी आहे. आज त्याला मिळालेल्या यशात एबीसीडी या चित्रपटाचा मोठा हात असल्याचे त्याचे म्हणणे आहे आणि हा चित्रपट करताना प्रभुदेवाने त्याला मोठा पाठिंबा दिला होता असे तो सांगतो. एबीसीडीमध्ये एकही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार नसल्याने चित्रपटाच्या बाबतीत रेमोच्या मनात सुरुवातीला धाकधूक होती. पण प्रभुदेवाने त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळेच या चित्रपटाची तो निर्मिती करू शकला असे त्याला नेहमी वाटते. याविषयी तो सांगतो, प्रभुदेवाशिवाय एबीसीडीची निर्मिती करणे अशक्य होते. एबीसीडी आणि एबीसीडी २ या दोन्ही चित्रपटांच्या कथा या प्रभुदेवाला समोर ठेवूनच लिहिण्यात आल्या होत्या आणि तिसऱ्या भागातही एका महत्त्वाच्या भूमिकेत तो झळकणार आहे. मला प्रभुदेवाविषयी खूप आदर आहे. पहिल्या दोन भागांचे चित्रीकरण करताना प्रभुदेवाला भाषेची खूपच अडचण जाणवली होती. पण आता त्याची भाषा बऱ्यापैकी सुधारली आहे. त्यामुळे चित्रीकरण करायला आणखी मजा येणार आहे. Also Read : या कारणामुळे सध्या रेमो डिसोझा चित्रपटात कोरिओग्राफी खूपच कमी करत आहे