'थपकी प्यार की' फेम अभिनेत्री जिज्ञासा सिंग सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. अलीकडे, अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. अभिनेत्रीने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. जिज्ञासाने काही YouTube व्हिडिओंचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत ज्यात तिच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.
जिज्ञासा आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवणार्यांवर चांगलीच संतापली आहे. आपण जीवंत असून लोकांनी अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवण्याचे आवाहन तिनं केले. जिज्ञासाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हे लोक कोण आहेत जे हे पसरवत आहेत? चमत्कार ! पण मी जिवंत आहे त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवणं थांबवावं.” आपल्या मृत्यूबद्दलच्या या अफवा वाचून अभिनेत्रीला धक्का बसला आणि तिने अशा निरधारित अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितलं.